operation Sindoor नंतर गजवा-ए-हिंद पुन्हा सुरू !

operation Sindoor नंतर गजवा-ए-हिंद पुन्हा सुरू !

131
operation Sindoor नंतर गजवा-ए-हिंद पुन्हा सुरू !
operation Sindoor नंतर गजवा-ए-हिंद पुन्हा सुरू !

उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने पाकिस्तानसाठी हेरगिरी (operation Sindoor) करण्याच्या आरोपाखाली वाराणसी येथून तुफैल नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर भारताच्या अंतर्गत सुरक्षेबद्दलची संवेदनशील माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप आहे. तुफैल फेसबुकद्वारे पाकिस्तानातील फैसलाबाद येथील रहिवासी नफीसा नावाच्या महिलेशी संपर्कात होता, जिचा पती पाकिस्तानी सैन्यात आहे. (operation Sindoor)

उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने एका निवेदनात म्हटले आहे की, “तुफैलने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्समध्ये पाकिस्तानी दहशतवादी संघटना तहरीक-ए-लब्बैकचा नेता मौलाना शाह रिझवी याचे व्हिडिओ शेअर केले होते. ज्यामध्ये ‘गजवा-ए-हिंद’, बाबरी मशीद पाडल्याचा बदला घेण्याचे आणि भारतात शरिया कायदा लागू करण्याचे आवाहन करण्यात आले होते.” (operation Sindoor)

हेही वाचा-Imran Khan : तुरुंगातून न्यायालयात तारखेला आलेला अंडरट्रायल आरोपी मोकाट !

दहशवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासादरम्यान असे आढळून आले की तुफैल कथितपणे राजघाट, नमो घाट, ज्ञानवापी, रेल्वे स्टेशन आणि लाल किल्ला यासारख्या संवेदनशील ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांना पाठवत होता. (operation Sindoor)

हेही वाचा- तूर खरेदीला केंद्र सरकारकडून 28 मे पर्यंत मुदतवाढ; Jayakumar Rawal यांची माहिती

निवेदनात असेही म्हटले आहे की, “तुफैलने पाकिस्तानद्वारे चालवल्या जाणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सची लिंक वाराणसीतील इतर अनेक लोकांना पाठवली होती. याद्वारे पाकिस्तानी अधिकारी आणि स्थानिकांमध्ये संपर्क साधला जायचा. तो ६०० हून अधिक पाकिस्तानी क्रमांकांवर संपर्कात होता. तुफैल फेसबुकद्वारे पाकिस्तानातील फैसलाबाद येथील रहिवासी नफीसा नावाच्या महिलेशी संपर्कात होता, जिचा पती पाकिस्तानी सैन्यात आहे.” (operation Sindoor)

हेही वाचा- Nala Safai : पाऊस आला धावून, नाल्यातील गाळ गेला वाहून; यंदा मुंबईचे काही खरे नाही!

भारत-पाकिस्तान सीमेवर एक व्यक्ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या मदतीने तस्करीच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती देणाऱ्याने असाही आरोप केला की, तो पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस साठी हेरगिरी करत होता आणि देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होता. याबाबत हिंदुस्तान टाइम्सने वृत्त दिले आहे. (operation Sindoor)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.