ड्रग्सच्या गुन्ह्यात आर्थर रोड तुरुंगात असलेला अंडरट्रायल आरोपीने (Imran Khan) मनसेचे कामगार सेनेचे उपाध्यक्ष अमित मटकर यांना त्यांच्या कार्यालया जवळ येऊन धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अमित मटकर यांनी या प्रकरणी तक्रार अर्ज आणि त्यांच्या कार्यालयाबाहेरील सीसीटीव्ही फुटेज आग्रीपाडा पोलिसांना दिले आहे. आग्रीपाडा पोलिसांनी अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल केला नसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. (Imran Khan)
हेही वाचा-Nala Safai : पाऊस आला धावून, नाल्यातील गाळ गेला वाहून; यंदा मुंबईचे काही खरे नाही!
आरोपीला तुरुंगातून सत्र न्यायालयात तारखेसाठी आणण्यात आले होते. त्या दरम्यान आरोपी हा मित्राच्या दुचाकीवरून आग्रीपाडा येथे आला होता व मटकर यांना धमकावून गेला असल्याचा आरोप असून त्याच्याकडे मोबाईल फोन देखील असल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे. या दरम्यान आरोपीला न्यायालयात घेऊन येणारे सशस्त्र दलाचे पोलीस दलाचे पोलीस शिपाई कुठे होते, गंभीर गुन्ह्यातील आरोपीला त्यांनी मोकाट कसे सोडले असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Imran Khan)
हेही वाचा- India-Bangladesh Trade Relation : सद्यस्थिती व आव्हाने
इम्रान खान (Imran Khan) असे या आरोपीचे नाव आहे. इम्रान खानला मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ४ च्या पथकाने ४० किलो गांजा सह डिसेंबर २०२४ मध्ये अटक केली होती. ७ डिसेंबर रोजी त्याची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, त्यानंतर त्याची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. तेव्हापासून तो आर्थर रोड तुरुंगात अंडरट्रायल कैदी म्हणून आहे, इम्रानला प्रत्येक तारखेला सत्र न्यायालयात हजर करण्यात येते, त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी सशस्त्र पोलीस दलाचे कर्मचारी सोबत असतात. (Imran Khan)
हेही वाचा- काश्मीरमध्ये Kishtwar येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण
१६ मे २०२५ रोजी इम्रान खान याची न्यायालयांची तारीख असल्यामुळे त्याला तुरुंगातुन न्यायालयात हजर करण्यासाठी बाहेर काढण्यात आले होते, त्याच्या सोबत सशस्त्र दलाचे पोलीस जवान न्यायालयात हजर करण्यासाठी देण्यात आले होते. दुपारी दीड वाजता त्याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने त्याला पुढची तारीख दिली होती. न्यायालयातून थेट तुरुंगात नेण्याची जवाबदारी सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांची होती. मात्र न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर आरोपी इम्रान हा एका दुचाकीवरून मनसेचे कामगार सेनेचे उपाध्यक्ष अमित मटकर यांचे कार्यालय असलेल्या जे.आर.बोरीचा मार्ग या ठिकाणी आला, त्याने चेहऱ्याला मास्क लावला होता, त्या ठिकाणी येऊन त्याने अमित मटकर यांना कार्यालयाच्या ठिकाणी येउन “तु इधर क्यु बैठा है,बैठने का नही, नही तो समझ जा” अशी धमकी दिली असे अमित मटकर यांनी आग्रीपाडा पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. (Imran Khan)
हेही वाचा- Pakistan चा समर्थक तुर्कीला भारताने कडक शब्दांत सुनावले; म्हणाले…
अमित मटकर यांनी अर्जात म्हटले आहे की, धमकी देणारी व्यक्ती त्यांच्यावर २०१७ मध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपीच्या सम्बधित असून ही व्यक्ती मला धमकावण्याच्या हेतुने या ठिकाणी आलेली होती, असा आरोप अर्जात करण्यात आला आहे. अमित मटकर यांनी १६ मे, २०२५ रोजीचे सीसीटीव्हीचे फुटेज तक्रार अर्जासोबत जोडले आहे. (Imran Khan)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community