-
चंद्रशेखर नेने
आपल्या भारत देशाला स्वतःच्या जन्मापासून पाण्यात पाहणारा, आपला पश्चिमेकडचा शत्रू देश पाकिस्तान (Pakistan) हा आता मोडकळीस आलेला आहे आणि तुटायच्याच बेतात आहे. अर्थात हे होण्यासाठी पाकिस्तानी राज्यकर्ते आणि तेथील सर्वसामान्य जनता जी कट्टर धर्मांध आहे, तीच सर्वस्वी जबाबदार आहे. काहीही कारण नसताना गेल्या महिन्यामध्ये 22 एप्रिल रोजी, काश्मीरमध्ये पहलगाम येथे अतिशय निर्घृण आणि भ्याड असा हल्ला करण्यात आला. त्यामध्ये आपले 26 निरपराध नागरिक अतिशय निर्दयपणे ठार करण्यात आले. ते दहशतवादी, पाकिस्तानी सैन्याचाच एक भाग होते! आता असं कळतं की, त्या हल्ल्याची प्रेरणा त्यांचे सध्याचे जनरल लष्करशहा असीम मुनीर याचीच होती. मुनीर स्वतः कट्टर धर्मांध आहे आणि त्याने या हल्ल्याला सर्वप्रकारे मदत केली. त्यामध्ये त्याचा स्वार्थ होता, कारण त्याची जनरल पदाची मुदत यावर्षीच्या ऑक्टोबरमध्ये संपत होती. वयानुसार तो निवृत्त होणार होता ते घडू नये म्हणून आणि पाक सैन्य आणि स्वतः मुनीर हे पाकिस्तानला (Pakistan) अतिशय आवश्यक आहे हे दाखवण्यासाठी, त्याने मुद्दाम जाऊन भारताची ही खोडी काढली. पण ही खोडी मात्र त्याला प्रचंड महागात पडलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनमोहन सिंग नव्हे याचं सामान्य ज्ञान सुद्धा मुनीर याला नव्हतं. मोदींनी या प्रकारच्या धर्म विचारून आणि निवडकपणे हिंदूंना मारण्याच्या भ्याड कृत्याला अतिशय कठोर आणि सडेतोड उत्तर दिलं ते म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर! पण ऑपरेशन सिंदूर घडवण्याच्या आधी मोदींनी 23 एप्रिल 2025 रोजी सिंधू पाणी वाटप करार हा स्थगित केला. गेली अनेक वर्ष सिंधू पाणी वाटप करार, हा पाकिस्तानच्या संपूर्ण फायद्याचा आहे हे मोदींना माहीत होते. 1960 साली हा करार केला.
(हेही वाचा – Shankhnad Mahotsav 2025 : युद्धात भारताच्या विजयप्राप्तीसह सैनिक आणि धर्मकार्य करणाऱ्यांच्या रक्षणार्थ शतचंडी याग पार पडला)
तेव्हा आपले तेव्हाचे पाकमित्र पंतप्रधान नेहरू, ज्यांना मी ‘गुलाबी चाचा’ म्हणतो, त्यांनी पाकिस्तानला (Pakistan) भरपूर मदत होईल या पद्धतीने पाणीवाटप केलं होतं. पण पंतप्रधान मोदी यांनी हा करार आता मोडीतच काढलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानला आता पाण्याची भयंकर टंचाई जाणवते आहे. म्हणूनच पाकिस्तानच्या अंतर्गत प्रांतांमध्येच, म्हणजे पंजाब आणि सिंध यांच्यामध्येच भांडण लागलेल आहे. कारण पंजाबी प्रजा सिंधूमध्ये असलेलं पाणी जास्तीत जास्त ओढून घेण्याच्या मागे आहे. त्यामुळे सिंधमधील शेतकऱ्यांना पाणी उरणारच नाही आणि तिथे भीषण दुष्काळ पडेल. हे सहन करणे सिंधी प्रजेला शक्यच नाही. आजच आपण पाहिल असेल की सिंध प्रांतामध्ये प्रजा आणि सरकार यांच्यामध्ये बंदूका घेऊन मारामारी सुरू झालेली आहे. तिथे सिंधी प्रदेशाने “कल बांगलादेश था, आज सिंधू देश होगा” अशा घोषणा देणे सुरू केले आहे. हे कमी म्हणावं तर बलुचिस्तानच्या प्रजेने आता पाकिस्तानी सैन्याला सळो की पळो करून सोडले आहे. असं म्हणतात की जवळजवळ 70 टक्के बलूचिस्थान आता पाकिस्तानच्या (Pakistan) ताब्यात राहिलेला नाही. त्यामुळे लवकरच हा प्रांत एक स्वतंत्र देश म्हणून पुढे येईल याची खात्री वाटते. बलूचिस्थानमध्ये भरपूर नैसर्गिक संसाधन आहेत. जसं की इंधनतेल व नैसर्गिक वायू, सोन, तांबे, पारा इत्यादी खनिजे इथे भरपूर सापडतात. हा प्रांत पाकिस्तानच्या ताब्यातून सुटल्यानंतर पाकिस्तान अधिकाअधिक भिकारी होईल. त्याच सिंधूच्या दुष्काळाची भर पडेल.
(हेही वाचा – Vaishnavi Hagawane Suicide Case : राजेंद्र हगवणे यांच्यासह पूत्र सुशील यांची पक्षातून हकालपट्टी; राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय)
उत्तरेला खैबर पखतूनख्वा या प्रांतात तालिबानी पठाण ह्या दोघांनी जोरदार आघाडी उघडली आहे. आणि त्यांना अफगाणिस्थान मधल्या तालिबान सरकारचं संपूर्ण समर्थन आहे. त्याशिवाय तालिबान सरकार त्यांच्याकडच्या कुणार आणि काबुल या नद्यांवर धरण बांधून सिंधूचा प्रवाह आणखी कमी करत आहे. जेणेकरून उर्वरित पाकिस्तान (Pakistan) तहानेने तडफडून मरेल. ही सगळी चिन्ह पाकिस्तान एक देश म्हणून एकत्र राहील याची खात्री देणारी नाही. आता भारत सरकारने तातडीने बलुची लिबरेशन आर्मी आणि तालिबानी यांना मदत करून ह्या पाकिस्तानचे एक धक्का मारून चार तुकडे करणे अतिशय गरजेचे आहे. असे झाले म्हणजे फक्त पाकिस्तानी पंजाब हा एक लहानसा दुष्काळी प्रांत राहील आणि पाकिस्तानचा आपल्याला होणारा त्रास बऱ्यापैकी कमी होईल. शिवाय आपण एक गोष्ट मात्र खात्रीने केली पाहिजे, ती म्हणजे, ह्या वेळेला पाकिस्तानी पंजाबमधून एक देखील निर्वासित भारतात येता कामा नये. त्यांनी तिथेच एकमेकांचे गळे कापत मरावं. हे जेव्हा होईल तेव्हाच भारताला खऱ्या अर्थाने सुरक्षा मिळेल. आणि ती वेळ आता खूपच जवळ आलेली आहे. कारण नेहमीसारखी अण्वस्त्रांची धमकी देण्याच्या स्थितीत देखील पाक लष्कर नाहीये. आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांचे अण्वस्त्रांचे दात देखील पाडून टाकलेले आहेत. तेव्हा आता एकच घोषणा “एक धक्का और दो और पाकिस्तान (Pakistan) तोड दो! पाकिस्तानचे हयाप्रमाणे, बलुचिस्थान, खैबर पखतूनख्वा, सिंधुदेश आणि एक बरकसा पश्चिम पंजाब! असे चार तुकडे होतील. गिलगीट बालटीस्तान आणि पीओके हे आपोआपच भारतात सामील होतील. जय हिंद !
हेही पहा –
Join Our WhatsApp Community