
भारतातला किनारी प्रदेश हा चविष्ट सागरी खाद्यपदार्थांसाठी म्हणजेच माशांसाठी खूप प्रसिद्ध आहेत. त्यांपैकीच एक मासा म्हणजे सिल्व्हर पोम्फ्रेट (पांढरं पापलेट) होय. आम्ही तुम्हाला या लेखामध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीने माशाचं कालवण म्हणजेच फिश करी (सिल्व्हर पोम्फ्रेट) (fish curry recipe in marathi) कशी तयार केली जाते ते सांगणार आहोत.
चविष्ट कालवण तयार करण्यासाठी सगळ्यात आधी दोन सोप्या गोष्टी कराव्या लागतील. एक म्हणजे मासे व्यवस्थित मॅरीनेट करणं आणि दुसरं म्हणजे मासे उकळत्या कालवणामध्ये सोडणं. तुम्ही हे कालवण ३५ मिनिटांत तयार करू शकता. तर अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीने पापलेटचं कालवण (fish curry recipe in marathi) तयार करण्यासाठी खाली दिलेली रेसिपी पाहा…
(हेही वाचा – राज्यभरातील परिवहन विभागाच्या ४३ जागांचा PPP तत्वावर विकास; अतिक्रमण हटवून वापरात आणण्याचा मंत्री Pratap Sarnaik यांचा निर्धार)
साहित्य
- २ मध्यम आकाराचे स्वच्छ केलेले पापलेट (डोके काढून टाकावे)
- १ टोमॅटो (प्युरी करून)
- १ दांडी कढीपत्त्याची पानं
- २ टेबलस्पून तेल
- चवीनुसार मीठ
- १ टेबलस्पून हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
- १/४ टेबलस्पून आलं (किसलेलं)
- १/२ टेबलस्पून लसूण पाकळ्या (किसलेल्या)
- १/२ टेबलस्पून गरम मसाला
- १ टेबलस्पून लाल तिखट
- १/४ टेबलस्पून हळद पावडर
- गरजेनुसार पाणी
- २ टेबलस्पून नारळाचं दूध
- १ टेबलस्पून कोथिंबीर (बारीक चिरलेली) (fish curry recipe in marathi)
(हेही वाचा – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हस्ते ज्येष्ठ व्याख्याते Durgesh Parulkar यांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार प्रदान)
कृती
१. हळद, लाल तिखट, गरम मसाला, हिरवी मिरची, मीठ, लसूण आणि आलं हे सर्व एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करा. स्वच्छ केलेल्या पापलेटांवर चिरे मारून घ्या.
२. त्यानंतर तयार केलेली मसाल्यांची पेस्ट त्या चिरांमध्ये भरा. बाहेरूनही सगळे मसाले माशांना लावून चांगलं मॅरीनेट होण्यासाठी २० ते ३० मिनिटं बाजूला ठेऊन द्या.
३. मासे चांगले मॅरीनेट झाल्यानंतर एका पॅनमध्ये तेल घेऊन गॅसवर गरम करा. त्यानंतर त्यात कढीपत्त्याची पानं आणि टोमॅटो प्युरी घाला. चांगलं परतून घ्या.
४. टोमॅटो प्युरीला बाजूंनी थोडं तेल सुटेपर्यंत शिजवा. मग त्यात गरजेनुसार पाणी घाला. पाण्याला उकळी आली की मग मॅरीनेट केलेले मासे त्या मिश्रणात हलक्या हाताने सोडा आणि त्यावर झाकण ठेऊन मंद आचेवर सुमारे ५ ते ७ मिनिटं शिजू द्या.
५. अधूनमधून मिश्रण हलक्या हाताने थोडंस ढवळा. पाच ते सात मिनिटं उकळ्यानंतर त्यात नारळाचं दूध घाला. आता ते मिश्रण आणखी २ ते ३ मिनिटं उकळवा.
६. कालवण चांगलं उकळ्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरा आणि झाकण ठेवून गॅस बंद करा.
७. तुमचं अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचं पापलेटचं कालवण तयार आहे. हे कालवण तुम्ही साध्या भातासोबत किंवा इंद्रायणी भातासोबत गरम गरम सर्व्ह करु शकता. (fish curry recipe in marathi)
(हेही वाचा – कतार ते भारत व्हाया नेपाळ; एकेकाळचा कॅबचालक Ansarul Ansari याला दिल्लीत तपास यंत्रणांकडून अटक)
टिप्स :
- मासे गरजेपेक्षा जास्त शिजून तुटू नेतेत म्हणून कालवण व्यवस्थित उकळल्यावर त्यात मासे सोडा.
- मासे शिजलेत की नाही हे पाहण्यासाठी टूथपिकचा वापर करून टोचून पाहा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community