ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर (Durgesh Parulkar) यांचा ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. गोवा स्थित फार्मगुडी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानात सनातन संस्थेच्या वतीने सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दुर्गेश परुळकर (Durgesh Parulkar) हे सावरकर विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्र आणि धर्म जागृतीसाठी कायम लिखाण करत असतात. तसेच त्यांनी आजवर शेकडो ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. त्याच बरोबर त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. दुर्गेश परुळकर हे मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्तही आहेत.
(हेही वाचा पाकिस्ताननंतर आता Bangladesh ला आली भारतविरोधात खुमखुमी; चीनचे तळवे चाटत युनूस सरकार कोणता रचतोय डाव? )
सनातन संस्थेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३वा वाढदिवस यानिमित्ताने १७ ते १९ मे दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात हिंदु धर्मजागृती आणि राष्ट्ररक्षणासाठी कार्य करणार्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या शुभहस्ते हस्ते ४ जणांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’, तर २० जणांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी कार्यक्रमाला २३ देशांतील २० हजारांहून अधिक साधक आणि हिंदू धर्मप्रेमी उपस्थित होते. या प्रसंगी व्यासपीठावर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती होती.
यावेळी उत्तर प्रदेश येथील आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड, बांगलादेश येथील ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक पू. अधिवक्ता रवींद्र घोष, कर्नाटक येथील पंचशिल्पकार पू. काशीनाथ कवटेकर, महाराष्ट्रातील मुंबई येथील प्रख्यात प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे, यांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर यांच्यासह भाग्यनगर येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह, काशी-मथुरा येथील मंदिरमुक्तीसाठी लढा देणारे सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु जैन, कर्नाटक येथील श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांच्यासह २० जणांना ‘सनातन धर्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Join Our WhatsApp Community