
-
ऋजुता लुकतुके
विराट कोहली लीगच्या इतिहासात एकाच लीगकडून सर्वाधिक हंगाम खेळणारा क्रिकेटपटू आहे. लीगच्या सुरुवातीपासून १८ हंगाम तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे. जसा भारतीय क्रिकेटवर त्याचा प्रभाव आहे, तसाच प्रभाव या फ्रँचाईजीवरही आहे. तंदुरुस्ती, फलंदाजीची शैली आणि सुरू केलेली परंपरा यासाठी तो अनेकांचा आदर्श खेळाडू आहे. यंदाच्या हंगामात बंगळुरू फ्रँचाईजीचा नवीन यष्टीरक्षक जितेश शर्माला विराटबरोबर फलंदाजीची संधी मिळाली. ११ कोटी रुपये खर्चून फ्रँचाईजीने जितेशला करारबद्ध केलं आहे. (IPL 2025, Virat Kohli)
टी-२० क्रिकेटमध्ये मिळवलेलं यश आणि त्यातही विराटबरोबर खेळण्याचा अनुभव अलीकडेच जितेशने फ्रँचाईजीच्या एका पॉडकास्टमध्ये शेअर केला. जितेशने मयंती लँगरशी बोलताना विराटने शिकवलेले तीन मंत्रच ऐकवले. ‘स्थिर मनाने खेळणं, शांतपणे निर्णय घेणं आणि सामन्यापुरता विचार करणं, या तीन गोष्टी विराटने खेळपट्टीवर एकत्र असताना सांगितल्या असं जितेश म्हणतो. (IPL 2025, Virat Kohli)
(हेही वाचा – कोकाटेंची पलटी… Chhagan Bhujbal यांचा विजय; आधी टीकेचा मारा, आता मंत्रिपदावर ‘मनापासून स्वागत’)
𝗝𝗶𝘁𝗲𝘀𝗵 𝗦𝗵𝗮𝗿𝗺𝗮: 𝗕𝗿𝗮𝘃𝗲, 𝗦𝗺𝗮𝗿𝘁 𝗮𝗻𝗱 𝗛𝘂𝗺𝗯𝗹𝗲
Jitesh talks about his cricket, mindset, equation with Rajat, discussions with Virat, and more on @bigbasket_com presents RCB Podcast Bold and Beyond. 🎬
Here’s a sneak peek. Full episode dropping soon… 🎙️… pic.twitter.com/aUZOCf7yae
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 21, 2025
जितेश पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. त्याविषयी विराटने विशेष मार्गदर्शन केल्याचं जितेशने सांगितलं. ‘तू पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येतोस. या क्रमांकावर फलंदाज फक्त षटकार मारण्याचाच विचार करत असतो. पण, तू फलंदाज म्हणून स्वत:ला ओळख. तू कुठे फटकेबाजी करू शकतोस ते ओळखून मग त्या चेंडूंवर आणि दिशेला फटकेबाजी कर. सातत्य नेहमी उपयोगी पडतं,’ असं विराटने पहिल्याच सामन्यात सांगितल्याचं जितेश शर्माने पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे. (IPL 2025, Virat Kohli)
आपले मित्र विराटबरोबर छायाचित्र घेण्यासाठी गळ घालतात असं त्याने आवर्जून सांगितलं. पण, त्याचबरोबर मंद हसत एक गोष्ट स्पष्ट केली. ‘मी स्वत:च अजून इच्छा असूनही विराटबरोबर फोटो घेतलेला नाही. त्यामुळे मित्रांसाठी विनंती करण्याचा तर धीरच होत नाही,’ असं जितेश लाजत लाजत म्हणाला. बंगळुरू संघाचा पुढील सामना शुक्रवारी सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध लखनौ इथं होणार आहे. (IPL 2025, Virat Kohli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community