पाकिस्ताननंतर आता Bangladesh ला आली भारतविरोधात खुमखुमी; चीनचे तळवे चाटत युनूस सरकार कोणता रचतोय डाव? 

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशातील नवीन अंतरिम सरकारने भूमिका बदलली आहे. युनूस यांनी पदभार स्वीकारताच चीनला भेट दिली आणि दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्याबाबत चर्चा केली. त्यामळे आता भारताला पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशचा 'उपचार' करावा लागणार आहे.

65

भारताच्या विरोधात कुरघोडी करण्यासाठी चीनने आधी पाकिस्तानला फितवले. पैशाची भीक मिळते म्हणून पाकड्यांनी चीनला पीओके येथे आणले. दुसरीकडे भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी करून काश्मीर अशांत करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातच पेहलगाम येथे दहशतवादी हल्ला केला आणि संतापलेल्या भारताने कूटनीती वापरून ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला सणसणीत कानशीलात मारली. ज्यामुळे चीनला पाकड्यांचे समर्थन करण्यासाठी पुढे येणे अवघड बनले. आता चीनने त्याचा मोर्चा बांगलादेशकडे (Bangladesh) वळवला आहे. तेथील युनूस सरकार आता पैशासाठी चीनचे तळवे चाटत भारतविरोधी कुरघोडी करण्यास सुरुवात करत आहे. युनूस सरकारला पाकिस्तानला आलेल्या अनुभवाचा विसर पडला आहे.

भारताला अडचणीत आणण्यासाठी चीन पुन्हा एकदा त्याची नवीन क्लुप्ती लढवत आहे. यावेळी चीनने बांगलादेशला (Bangladesh) हाताशी धरले आहे. भारताच्या अत्यंत संवेदनशील चिकन नेक प्रदेशात असलेल्या लालमोनिरहाट येथील बांगलादेशच्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील हवाई तळावर चीनने आपली वाईट नजर टाकली आहे. हे एअरबेस सिलिगुडी कॉरिडॉरजवळ आहे. चिकन नेक हा पश्चिम बंगालमधील (Bangladesh) २० किलोमीटर रुंद पट्टा आहे, जो भारताला ईशान्येकडील राज्यांशी जोडतो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील हवाई तळावर चीनची वाईट नजर भारतासाठी चिंतेचे कारण असू शकते.

(हेही वाचा मंदिर ट्रस्ट आणि Waqf ची तुलना होऊ शकते का? केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात काय केला युक्तीवाद? वाचा सविस्तर…)

२०१८ च्या सुरुवातीला चीनने लिलमोनिरहाट एअरबेसमध्ये रस दाखवला होता, परंतु पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारने मोठ्या प्रमाणात चीनला उघडपणे विरोध केला होता. त्यानंतर काही काळ हे प्रकरण थांबले होते, परंतु आता चीन पुन्हा एकदा लक्ष ठेवून आहे. शेख हसीना यांनी २०१९ मध्ये बांगलादेशातील (Bangladesh) पहिले विमान विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यांनी लालमोनिरहाटमध्ये बंगबंधू शेख मुजीबुर रहमान एव्हिएशन अँड एरोस्पेस विद्यापीठाचे कायमस्वरूपी कॅम्पस बांधण्याची योजना आखली होती, परंतु कोरोना विषाणूमुळे काम मंदावले होते. या प्रकरणात चीनने प्रवेश केला होता. त्यांनी कर्जाच्या आधारावर आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु शेख हसीना यांनी हा प्रस्ताव नाकारल्याचे वृत्त आहे. चीन-बांगलादेश जवळीक भारताची चिंता वाढवू शकते. चीन आता पुन्हा समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील नवीन अंतरिम सरकारने भूमिका बदलली आहे. युनूस यांनी पदभार स्वीकारताच चीनला भेट दिली आणि दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्याबाबत चर्चा केली. त्यामळे आता भारताला पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशचा ‘उपचार’ करावा लागणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.