Love Jihad Case : लव्ह जिहादचे खंडन करणाऱ्या ‘द वायर’चा पत्रकार निघाला ‘लव्ह जिहादी’; पीडितेची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल

'द वायर'चा पत्रकार उमर रशीद याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता लव्ह जिहाद(Love Jihad Case)चे खंडन करणाऱ्या 'द वायर'चा पत्रकार असलेले उमर रशीद याचं लव्ह जिहाद प्रकरण(Love Jihad Case) उघडकीस आले आहे.

86

‘द वायर’चा पत्रकार उमर रशीद याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता लव्ह जिहाद(Love Jihad Case)चे खंडन करणाऱ्या ‘द वायर’चा पत्रकार असलेले उमर रशीद याचं लव्ह जिहाद प्रकरण(Love Jihad Case) उघडकीस आले आहे.

दरम्यान, लव्ह जिहाद असे काही नसते असे आपल्या प्रचारामार्फत मांडणाऱ्या द वायरचा पत्रकारच आता अडचणी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे उमर रशीद याच्यावरील गंभीर आरोप द वायरने स्वीकारले असून या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे म्हटले आहे. हिंदू जोडीदाराने उमर रशीदचा धर्मनिरपेक्ष मुखवटा फाडला असून उमर रशीदच्या पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

(हेही वाचा मंदिर ट्रस्ट आणि Waqf ची तुलना होऊ शकते का? केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात काय केला युक्तीवाद? वाचा सविस्तर… )

‘द वायर’च्या पत्रकाराने आता एका हिंदू महिलेने उमर रशीदवर बलात्कार, मानसिक आणि शारीरिक छळ, गोमांस खाणे यासह इतर गंभीर आरोप लावण्यात आले आहे. तथाकथित पुरोगामी आणि उदारमतवादी पत्रकार उमर रशीद राजकीय पत्रकार म्हणून द वायरमध्ये कार्यरत आहे. पीडितेने पोस्टमध्ये म्हटले आहे की, उमर रशीदने या युक्तीद्वारे अनेक महिलांना त्याच्या जाळ्यात अडकिवले आहे. महिलांसमोर उमर रशीद खोटी प्रतिमा सादर करून महिलांना जाळ्यात ओढतो.

पीडित हिंदू महिलेने इन्स्टाग्रामवर यासंदर्भात मोठा खुलासा केला असून आपली व्यथा तिने पोस्टच्या माध्यमातून मांडली आहे. या पोस्टद्वारे झालेल्या खुलाश्यानंतर पत्रकार उमर रशीदची मानसिक पातळी आणि अज्ञान किती आहे याचा सहज अंदाज येतो. उमर रशीद दिल्लीतील काही वामपंथी माध्यमांशी संबंध असल्यामुळे व एक अनुभवी पत्रकार असल्याने ती त्याच्या जाळ्यात अडकली. सुरुवातीला, रशीदने ‘पुरोगामी राजकारण’ आणि ‘लोधी गार्डन’मध्ये फिरण्याच्या बहाण्याने तिला त्याच्या जाळ्यात अडकविल्याचे पीडितेने म्हटले आहे.(Love Jihad Case)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.