Volkswagen Golf GTI : फोक्सवॅगन गोल्फ जीटीआय गाडीचं भारतात प्री बुकिंग सुरू; २६ मे ला लाँचिंग

Volkswagen Golf GTI : या प्रिमिअम हॅचबॅक गाडीची किंमत ६० लाख रुपये असेल. 

43
Volkswagen Golf GTI : फोक्सवॅगन गोल्फ जीटीआय गाडीचं भारतात प्री बुकिंग सुरू; २६ मे ला लाँचिंग
  • ऋजुता लुकतुके

फोक्सवॅगन कंपनीने आपली प्रिमिअम हॅचबॅक गाडी गोल्फ जीटीआयचं बुकिंग भारतात सुरू केलं आहे. येत्या २६ मेला विक्रीही सुरू होणार आहे. ही गाडी भारतात बनणार नाही. त्यामुळे ती बाहेरून आयात होईल. मिनी कूपर एसशी स्पर्धा करण्यासाठी फोक्सवॅगन कंपनीने ती बनवलीय यावरूनच तिची कल्पना करता येईल. सुरुवातला फक्त १५० गाड्या भारतात मागवण्यात येणार आहेत. त्यांची नोंदणी पूर्ण झाल्यामुळे कंपनीने नवीन बुकिंग घेणं तात्पुरतं थांबवलं आहे. (Volkswagen Golf GTI)

असं काय आहे या गाडीत? गाडीची शक्ती २६५ अश्वशक्ती इतकी असेल. २.० लीटरचं पेट्रोल इंजिन यात देण्यात आलं आहे. शून्य ते १०० किलोमीटर प्रती तासापर्यंत पोहोचण्यासाठी गाडीला फक्त ५.९ सेकंद लागतील. गाडीतील सगळ्यात जास्त वेग मर्यादा आहे ती २५० किमी प्रती तासांची. भारतीय रस्त्यांवर इतक्या वेगाचा आपण विचारही करू शकत नाही. गाडीत ७ स्पीडचा ड्युआल क्लच ऑटोमेटिक गिअर बॉक्स असेल. (Volkswagen Golf GTI)

(हेही वाचा – IPL 2025, MI vs DC : मुंबई इंडियन्सची गाडी सुसाट; दिल्लीला ५९ धावांनी हरवत गाठली बाद फेरी)

गाडीच्या पुढच्या भागात ग्रिलवर मॅट्रिक्स पद्धतीची दिव्यांची माळ असेल. तिच्या टोकाला मधमाशांच्या पोळ्याला असतो तसा षटकोनी मोठा दिवाही दोन्ही बाजूला असेल. शिवाय बंपरवर एक्स आकाराचे फॉग दिवेही बसवण्यात आले आहेत. गाडीच्या पाठीमागे एलईडी दिव्यांची माळ असेल. किंग्ज रेड, ग्रेनेडिला ब्लॅक, ऑरिक्स व्हाईट आणि मूनस्टोन ग्रे अशा चार रंगात ही गाडी सध्या उपलब्ध आहे. (Volkswagen Golf GTI)

गाडीच्या आतील सीट या लेदरच्या तर चालकासमोरील स्टिअरिंग व्हीललाही लेदरचं गोलाकार कव्हर असेल. १२.९ इंचांचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले आणि चालकासमोर असलेला १०.२५ इंचांचा डिजिटल डिस्प्ले गाडीचा लुक आणि शान वाढवणारे आहेत. शिवाय गाडीत ७ स्पीकर असलेली ऑडिओ स्पीकर प्रणाली आहे आणि विस्तीर्ण सनरूफही आहे. फोक्सवॅगन कंपनीची आतापर्यंतची भारतातील ही सगळ्यात महाग गाडी असेल. टायगन गाडी ही सध्या ५६ लाखांच्या आसपास विकली जात आहे. नवीन गोल्फ जीटीआय गाडीची सुरुवातच ६० लाख रुपयांपासून असेल. (Volkswagen Golf GTI)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.