ऋजुता लुकतुके
एकदिवसीय क्रिकेटची (ICC Champions Trophy) लोकप्रियता कमी झाल्याचं अनेकदा बोललं जातं. पण, काही महिन्यांपूर्वी पाकिस्तान आणि दुबईत झालेल्या चॅम्पियन्स करंडकाने टीव्ही प्रेक्षक संख्येचे सर्व विक्रम मोडले आहेत. तब्बल ३६८ अब्ज मिनिटं लोकांनी या स्पर्धेचं प्रसारण पाहिलं. आणि जागतिक स्तरावर हा विक्रम आहे. आधी २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या तुलनेत यात १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. दुबईत भारत आणि न्यूझीलंड दरम्यान स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. आणि हा सामना जागतिक प्रेक्षकांनी ६५.३ अब्ज मिनिटं पाहिला. (ICC Champions Trophy)
हेही वाचा-Veer Savarkar Picture in Delhi Assembly : दिल्ली विधानसभेत झळकणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चित्र !
सरासरी प्रेक्षक संख्येचा विचार करता या स्पर्धेत एक पूर्ण षटक सरासरी ३८० दशलक्ष मिनिटं पाहिलं गेलं. आयसीसी स्पर्धेसाठी हा एक उच्चांक आहे. २०१७ च्या अंतिम सामन्याच्या तुलनेत यंदा ५२ टक्के जास्तं प्रेक्षक संख्या अंतिम सामन्याला लाभली. आणि आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाहिलेला सामना होता. या बाबतीत २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना आघाडीवर आहे. तर याच विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड हा उपान्त्य फेरीचा सामना दुसऱ्या क्रमांकावर आहे. (ICC Champions Trophy)
Great to confirm #ChampionsTrophy 2025 was the most-watched ever version of the event with 368B global viewing minutes, up 19% on 2017. The India-New Zealand Final’s 65.3B global live viewing minutes also broke a mark set at the 2017 Final by 52.1% https://t.co/CC6JmuVikd pic.twitter.com/5uLE8EDSXr
— Jay Shah (@JayShah) May 21, 2025
भारतात जिओ स्टार नेटवर्कवर ९ भारतीय भाषांमध्ये चॅम्पियन्स करंडक सामन्यांचं प्रक्षेपण करण्यात आलं. आणि इंटरनेटच्या माध्यमातून ओटीटी ॲपवर सामने पाहणाऱ्यांची संख्या यंदा जास्त होती. प्रेक्षक संख्येतील वाढ ही ऑस्ट्रेलियात सर्वाधिक होती. २०१७ च्या चॅम्पियन्स करंडकाच्या तुलनेत यंदा ६५ टक्के जास्त लोकांनी या स्पर्धेचा आनंद लुटला. अमेरिकेत टाईम झोन वेगळे असतानाही तिथे ३८ टक्के प्रेक्षक वाढ दिसून आली. (ICC Champions Trophy)
हेही वाचा- व्हाइट हाऊसमध्ये Donald Trump दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींसोबत भिडले ; Video Viral
यजमान पाकिस्तानने २०१७ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. पण, त्या वर्षीच्या तुलनेत तिथेही प्रेक्षक संख्येत २४ टक्क्यांची वाढ झाली. ऑस्ट्रेलियात ॲमेझॉन प्राईमने सामन्यांचं थेट प्रक्षेपण दाखवलं. आणि या ओटीटी माध्यमाला आधीच्या तुलनेत ६५ टक्के फायदा झाला. (ICC Champions Trophy)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community