‘Operation Sindoor’मध्ये ३ हजार अग्निवीरांची महत्त्वाची भूमिका; “पाकिस्तानी क्षेपणास्त्र आणि ड्रोन…”

भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना धडा शिकविण्यासाठी केलेल्या 'Operation Sindoor'अंतर्गत कारवाईत ०९ तळं तर १०० हून अधिक दहशतवाद्यांचा करण्यात आला.

123

भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना धडा शिकविण्यासाठी केलेल्या ‘Operation Sindoor’अंतर्गत कारवाईत ०९ तळं तर १०० हून अधिक दहशतवाद्यांचा करण्यात आला. या कारवाईत भारतीय सैन्यात कार्यरत ३ हजार अग्निवीरांनी हवाई संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे. अग्निवीरांनी स्थानिक पातळीवर विकसित केलेल्या आकाशतीर नावाच्या हवाई संरक्षण नियंत्रण आणि अहवाल प्रणालीला कार्यान्वित करण्यास मदत केल्याची माहिती मिळाली आहे.(Operation Sindoor)

(हेही वाचा Operation Sindoor : आकाश आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची गाथा शाळांमध्ये शिकवली जाणार )

दरम्यान, अग्निवीर योजनेअंतर्गत भरती झालेले जवान भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षादरम्यान भारताच्या हवाई संरक्षण ग्रीडचा केंद्रबिंदू म्हणून उदयास आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे अग्निवीर योजनेअंतर्गत भरती झालेल्या तरुण आणि धाडसी जवानांनी भारताच्या कारवाईत एका महत्त्वाच्या क्षणी त्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या अंमलात आणल्याचे दिसून आले. सलग चार दिवस चाललेल्या लष्करी कारवाईदरम्यान वेगवेगळ्या आघाड्यांवर अग्निवीरांनी आपल्या शौर्याची बाजी लावल्याने पाकिस्तानसोबतच्या युद्धाची भीती निर्माण झाल्याचे एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीनंतर सांगितले.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर

बुधवार, ७ मे रोजी पहाटे सुरू झालेले ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात दिले गेलेले चोख प्रत्युत्तर होते. भारतीय सैन्यदलांच्या कारवाईत पाकिस्तानातील ०९ दहशतवादी तळं आणि १०० हून अधिक दहशतवादी ठार मारले गेले. २६ पर्यटकांच्या हत्येनंतर भारतीय सैन्यदलाने केलेल्या कारवाईत सलग चार दिवस लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, ड्रोन, लांब पल्ल्याची शस्त्रास्त्रे यांचा वापर करण्यात आला. पाकिस्तानचे सरगोधा, मुरीदके आणि बहावलपूर यासारखे एअरबेस उद्ध्वस्त करण्यात आले. दि. १० मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओ चर्चेनंतर युध्दविरामावर एकमत झाले.(Operation Sindoor)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.