राज्यातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी व आधुनिक करण्यासाठी IIT-IIMच्या धर्तीवर “इंडियन इन्स्टिट्युट ऑफ पब्लिक हेल्थ (IIPH)” स्थापनेचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, विविध सेवाभावी संस्थांनी आपल्या नाविन्यपूर्ण आरोग्य उपक्रमांचे सादरीकरण आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समोर केले.
आज आरोग्य भवन येथे झालेल्या बैठकीत पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया, बेल एअर फाउंडेशन (महाबळेश्वर), स्पर्श रुरल हॉस्पिटल (धाराशिव), नंदिग्राम लायन्स आय हॉस्पिटल (नांदेड), इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन – महाराष्ट्र, IAPSM व इंदापूर तालुक्यातील डॉक्टर सुश्रुत शाह यांनी आपल्या अभिनव आरोग्य उपक्रमांची माहिती दिली.
(हेही वाचा – BMC : रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामावर उपनगराचे पालकमंत्री नाखुश, प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश)
आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण, संवाद कौशल्य वाढणार
पब्लिक हेल्थ फाउंडेशनच्या डॉ. झोडगे यांनी राज्यात IIPH स्थापन करून आरोग्य कर्मचाऱ्यांना व्यावसायिक संवाद कौशल्य, तांत्रिक प्रशिक्षण व क्षमता विकास यांसाठी एक मजबूत व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडला.
सास्तुर येथून ‘स्पर्श’चा आरोग्यप्रकाश – ग्रामीण आरोग्यसेवेला आधुनिक बळ
१९९३च्या भूकंपानंतर सास्तुर येथे सुरू झालेल्या प्राईड इंडिया संस्थेच्या स्पर्श रुरल हॉस्पिटलचे ‘मोबाईल मेडिकल युनिट’, ‘एम मित्रा’, ‘सुंदर माझा दवाखाना’ आणि ‘किचन गार्डन’ यांसारखे उपक्रम विशेष कौतुकास पात्र ठरले.
नंदिग्राम लायन्स ट्रस्ट आणि इतर संस्थांचे कौतुकास्पद सादरीकरण
नांदेडच्या नंदिग्राम लायन्स ट्रस्टच्या ‘Sight First’ उपक्रमाबरोबरच, तंबाखू नियंत्रण व IAPSM इंटरशिप प्रोग्रॅमही प्रभावी ठरले. पुण्यातील डॉ. सुश्रुत शाह यांनी सादर केलेल्या डास निर्मूलन प्रयोग व स्मार्ट पीएससी मॉडेलनेही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
आरोग्यसेवेसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – आरोग्यमंत्र्यांचे आवाहन
या सर्व उपक्रमांचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakashrao Abitkar) यांनी अभिनंदन करताना सांगितले की, “राज्यातील इतर आरोग्य संस्था या यशस्वी उपक्रमांचे अनुकरण करून आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत.”
या सादरीकरणामुळे राज्यातील आरोग्य क्षेत्रात नवचैतन्य येण्याची अपेक्षा असून, ‘इंडियन इन्स्टिट्युट ऑफ पब्लिक हेल्थ’च्या स्थापनेने महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेला शास्त्रशुद्ध दिशा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community