जनरल अयुब खाननंतर Mulla Asim Munir ने गिरवला जवाहरलाल नेहरूंचा कित्ता! कसा तो वाचा…

आपण फक्त दहशतवाद्यांना टार्गेट न करता दहशतवाद्यांची सपोर्ट सिस्टीम जी होती म्हणजे पाकिस्तानी आर्मी त्या पाकिस्तानी आर्मीला टार्गेट केलेले आहे. थोड्याच दिवसात मुल्ला मुनीर (Mulla Asim Munir) पळून जाईल. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पळपुटा मुनीर काही दिवस बंकर मध्येच लपून बसला होता. आता त्याला बंकरमध्ये लपण्याबद्दल बहुतेक फिल्ड मार्शल केले आहे. त्याला बंकर मार्शल करायला पाहिजे होते.

80

पाकिस्तानचा जनरल मुल्ला मुनीर (Mulla Asim Munir) याने स्वतः स्वतःला फिल्ड मार्शलचा खिताब घेतलेला आहे. फिड मार्शल हे सैन्यातले सर्वोच्च पद. पाकिस्तानामध्ये दोनच फिल्ड मार्शल आहेत याच्या आधीचे फिल्ड मार्शल आहेत मोहम्मद अयुब खान. जे पाकिस्तानचे पहिले मार्शल लॉ ऍडमिनिस्ट्रेटर. त्यांनी आधीच्या नागरी सत्तेला हाकलून दिले आणि स्वतः सत्तेत येऊन बसले. मार्शल लॉ जाहीर केला. मार्शल लॉ म्हणजे सगळी सत्ता सैन्याच्या ताब्यात येते. सैन्य त्यांना करायचे तेच करते आणि त्या सैन्याचा जो प्रमुख असतो तो स्वतःला चीफ मार्शल ऍडमिनिस्ट्रेटर अशी एक पदवी घेतो, हा फिल्ड मार्शल आयुब खान 65 ची लढाई हारला, 59 मध्ये त्याने स्वतःलाच फिल्ड मार्शल करून घेतले. मला वाटते त्यांनी हे सगळं आपल्या गुलाबी चाचांकडून शिकले असावे, कारण गुलाबी चाचांनी स्वतःला भारतरत्न घेतले होते, असे आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक चंद्रशेखर नेने ‘हिंदुस्थान पोस्ट’ या युट्युब वाहिनीवर बोलताना म्हणाले.

सैन्यातली सगळी पदे ब्रिटिश आणि अमेरिकन पद्धतीची आहेत. लेफ्टनंटपासून पुढे वर जात जनरल लेफ्टनंट. त्याच्यानंतर फिल्ड मार्शल. जनरलला नॉर्मली फोर स्टार जनरल म्हणतात. फिल्ड मार्शलला फाईव्ह स्टार जनरल म्हणतात, म्हणजे एक तारा आणखीन. भारताच्या सैन्यामध्ये फक्त दोन फिल्ड मार्शल झाले, पहिले म्हणजे फिल्ड मार्शल जनरल करीप्पा जे आपले फार मोठे नावाजलेले जनरल होते आणि दुसरे अर्थात जनरल एसएफ जे माणिकशॉ. त्यांना फिल्ड मार्शलचा बहुमान 71 ची लढाई जिंकल्यानंतर दिला.  पाकिस्तानात जनरल पदावरचे लोक कधीही पाकिस्तानात राहत नाहीत, रिटायर झाले की, पैसा उडवायला बाहेर जातात. जनरल असम बाजवा अमेरिकेत आहे. पिझ्झा चेन त्याच्या मालकीची आहे. जनरल राहील शरीफ हा सौदी अरेबियात गेला. सौदी अरेबियाचा कन्सल्टंट म्हणून तो तिथेच राहिला. पाकिस्तानमध्ये येऊन राहत नाही. राहिले तर त्यांना तुरुंगात जायला लागते, असे चंद्रशेखर नेने म्हणाले.

(हेही वाचा ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या पार्श्वभूमीवर स्त्रीशक्तीचा हुंकार; चिनी-तुर्कस्तानी वस्तूंवर बहिष्काराची शपथ घेऊन Sindoor Yatra द्वारे वीर सैनिकांना मानवंदना)

‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये अवघ्या 25 मिनिटांमध्ये पाकिस्तान सैन्याची 11 विमानतळे निकामी केली. अण्वस्त्र ठेवलेली गोदामे निकामी झाली. पाकिस्तानची अशी अवस्था मुल्ला मुनीरमुळे  (Mulla Asim Munir) झाली. इतर कुठला देश असता तर मुनीरला अक्षरशः लाथ मारून हाकलून दिला असता, पण पाकिस्तानची गोष्टच न्यारी. पाकिस्तानने तर त्याला फिल्ड मार्शल करून टाकले. त्याच्यावर पाकिस्तानमध्येच खूप विनोद होत आहेत, असेही नेने म्हणाले.

या वेळेला आपण फक्त दहशतवाद्यांना टार्गेट न करता दहशतवाद्यांची सपोर्ट सिस्टीम जी होती म्हणजे पाकिस्तानी आर्मी त्या पाकिस्तानी आर्मीला टार्गेट केलेले आहे. थोड्याच दिवसात मुल्ला मुनीर (Mulla Asim Munir) पळून जाईल. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पळपुटा मुनीर काही दिवस बंकर मध्येच लपून बसला होता. आता त्याला बंकरमध्ये लपण्याबद्दल बहुतेक फिल्ड मार्शल केले आहे. त्याला बंकर मार्शल करायला पाहिजे होते. मुनीरला फिल्ड मार्शल करण्यामागे आणखीन एक शक्यता अशी आहे की, पाकिस्तानमध्ये दोन पदे आहेत. एक फिल्ड मार्शल आणि दुसरे सीओएस म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ. सध्या मुनीरकडे (Mulla Asim Munir) दोन्ही पदे आहेत. फिल्ड मार्शल तर तो झालाच आहेत. फिल्ड मार्शलला पगार जास्त मिळत नाही. पण सीओएएस जो असतो त्याची सगळ्या सैन्यावरती हुकूमत चालते. फीड मार्शलला कोणाचीही हुकूमत चालत नाही. मुनीरच्या हाताखालचे जे जनरल आहेत ते आता वाट बघतात की, हा मुनीर कधी बाजूला होतो आणि आपल्याला कधी प्रमोशन मिळते. हा प्रकार अजून झालेला नाही, लवकरच ते मुनीरला फिल्ड मार्शलच फक्त ठेवतील त्याचा फोटो फक्त लावतील त्याला कुठलेही अधिकार दिले जाणार नाही. ज्या क्षणी मुनीरला (Mulla Asim Munir)  सीओएएस पदावरुन काढण्यात येईल, त्या क्षणी मुनीरचे पतन होईल, असेही चंद्रशेखर नेने म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.