Pakistan Sindh News: पाकिस्तानात गृह युद्ध पेटणार; सिंध प्रांतातील गृहमंत्र्यांच्या घरावर केला हल्ला

285
Pakistan Sindh News : पाक पुरस्कृत दहशतवादी देशात पुन्हा एकदा अंतर्गत गृह युद्ध सुरू झालं आहे. सध्या पाकड्या चारही बाजूंनी संकटात सापडला आहे. एकीकडे लष्करी युद्धात भारतासमोर गुडघे टेकलेल्या पाकवर बलुचिस्तान उरावर बसला असून, दुसरीकडे सिंध प्रांत पेटला आहे. सिंधमधील जनता वादग्रस्त कालव्याच्या प्रकल्पाच्याविरोधात रस्त्यावर उतरली आहे. दरम्यान,आंदोलकांनी मंगळवारी २० मे रोजी सिंधचे गृह मंत्री जियाऊल हसन लंजर (Sindh Home Minister Zia ul Hasan Lanjar) यांच्या घराला आग लावली. नौशेहरो फिरोज जिल्ह्यात गृहमंत्र्यांचं निवासस्थान (Fire breaks Sindh Home Minister’s residence) आहे. आंदोलकांनी लंजर यांच्या मालमत्तेचं नुकसान केलं असून, घरातील सामान पेटवून दिले आहे. (Pakistan Sindh News)
(हेही वाचा – गर्दी नियंत्रित करण्यासाठी Western Railway चा नवा प्लॅन; ‘या’ रेल्वे स्थानकात मेट्रोप्रमाणे तिकीट अन् सुरक्षा तपासणी होणार)
पंजाब आणि सिंधमध्ये पाणी वाटपावरून वाद (Punjab and Sindh Water Dispute) सुरू आहे. या मुद्द्यावरून हिंसाचार उसळला. अनियंत्रित जमावाने गृहमंत्र्यांच्या घराला लक्ष्य केले. गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला करणारे निदर्शक बंदुका घेऊन आले होते. संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. उष्णता वाढली असल्याने पाण्याची समस्याही वाढली आहे. 
सिंधमध्ये निदर्शने का केली जात आहेत?
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, नौशहरो फिरोज जिल्ह्यातील (Sindh Naushahro Feroze District) मोरो तालुक्यात पोलीस आणि निदर्शकांमध्ये भीषण संघर्ष झाला. किमान दोन निदर्शक ठार झाले आणि डझनभर जखमी झाले. तसेच सहा कालवे आणि कॉर्पोरेट शेती प्रकल्पांविरुद्ध हा निषेध पुकारण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्गावर धरणे आंदोलन करणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचे वृत्त आहे.
(हेही वाचा – Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : राष्ट्राचे रक्षण शस्त्रानेच करावे लागते; मेजर गौरव आर्य यांचे महत्त्वाचे विधान  )
निदर्शकांनी गृहमंत्र्यांच्या घराला लक्ष्य केले
संतप्त निदर्शकांनी सिंधचे गृहमंत्री झियाउल हसन लंजर यांच्या घराची तोडफोड केली, खोल्या आणि फर्निचर जाळले. गृहमंत्र्यांचे वैयक्तिक रक्षक आले तेव्हा निदर्शकांनी त्यांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून सुरक्षारक्षकांनी हवेत गोळीबार सुरू केला. आंदोलकांनी दरोडाही घातला आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकलाही आग लावण्यात आले. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.