-
ऋजुता लुकतुके
दक्षिण भारतात सगळीकडे मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शनिवारी बंगळुरू विरुद्ध कोलकाता हा सामनाही पावसात वाहून गेला होता. तिथे होणाऱ्या पुढील सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून बीसीसीआयने (BCCI) सनरायझर्स हैद्राबादविरुद्धचा (Sunrisers Hyderabad) सामनाही बंगळुरूमधून हलवून लखनौमध्ये भरवायचं ठरवलं आहे. बंगळुरू संघासाठी हा घरचा सामना असणार होता. आता आधीच्या पावसात वाहून गेलेल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यासाठीही बंगळुरू फ्रँचाईजीने चाहत्यांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत देऊ केले आहेत.
शुक्रवारी २३ मे रोजी लखनौच्या अटलबिहारी वायजेयी मैदानावर हा सामना आता पार पडेल. आणि हे मैदान बंगळुरू फ्रँचाईजीसाठी घरचं मैदान मानलं जाईल. बंगळुरूमध्ये सामना भरवण्यात पाऊस आणि प्रवासाच्या अडचणी अशी दुहेरी समस्या येऊ शकते. त्यामुळे बीसीसीआयने (BCCI) हा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा – National Herald Case : “गांधी कुटुंबाने आर्थिक गैरव्यवहारातून १४२ कोटी कमविले”; ईडीचा न्यायालयात मोठा दावा)
🚨 News 🚨
Schedule for TATA IPL 2025 Playoffs announced.
Additionally, Match no. 65 between #RCB and #SRH shifted to Lucknow from Bengaluru.
🔽 Details | #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2025
(हेही वाचा – Cabinet Decision : पाच वर्षात ३५ लाख घरांचा संकल्प; राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी)
आगामी दिवसांत पावसाच्या व्यत्ययाची शक्यता लक्षात घेऊन एकूणच आयपीएल (IPL 2025) प्रशासनाने नियमांतही एक महत्त्वाचा बदल केला आहे. सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास सामन्याचा कालावधी अतिरिक्त एका तासाने वाढवला जाऊ शकतो. आतापर्यंत किमान ५ षटकांचा सामना खेळवण्यासाठीही रात्री १०.४५ वाजेपर्यंत वाट बघता येत होती. पण, आता ११.४५ वाजेपर्यंत वाट बघितली जाईल. उर्वरित साखळी सामने आणि बाद फेरीच्या सामन्यांसाठी हा बदल लागू होईल.
बंगळुरू आणि हैद्राबाद (RCB vs SRH) सामन्याबद्दल बोलायचं झालं तर बंगळुरूने आधीच बाद फेरी गाठली आहे. पण, आयपीएल (IPL 2025) पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यांना एका आठवड्यात सामनाच खेळता आलेला नाही. त्यामुळे एकूण १५ दिवसांची विश्रांती संघाला मिळाली आहे. यात खेळाडूंची लय बिघडू नये यासाठी संघाचा प्रयत्न असेल. तर सनरायझर्स हैद्राबादचं (Sunrisers Hyderabad) आव्हान संपुष्टात आलं असलं तरी जाता जाता चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न ते करतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community