IPL 2025 Play-off : आयपीएलचे बाद फेरीचे सामने चंदिगड आणि अहमदाबादमध्ये होणार

 पावसाच्या शक्यतेमुळे कोलकात्याचा अंतिम सामना अखेर हलवण्यात आला आहे.

87

ऋजुता लुकतुके

बीसीसीआयने (BCCI) अखेर आयपीएलच्या (IPL 2025) बाद फेरीच्या सामन्यांची ठिकाणं जाहीर केली आहेत. नवीन वेळापत्रकानुसार, पहिला पात्रता सामना आणि एलिमिनेटर चंदिगडला (Chandigad) तर दुसरा पात्रता सामना आणि अंतिम सामना अहमदाबादला (Ahmedabad) होणार आहेत. २९ मे पासून बाद फेरीचे सामने सुरू होतील. तर ३ जूनला नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) अंतिम सामना रंगेल. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी पत्रक काढून नवीन ठिकाणं लोकांसमोर आणली आहेत. ‘गुणतालिकेत पहिल्या व दुसऱ्या संघांदरम्यान होणारा पहिला पात्रता सामना न्यू चंदिगड इथे पंजाब क्रिकेट असोसिशनच्या मैदानावर होईल. आणि बाद सामनाही याच मैदानावर होईल. २९ व ३० तारखांना हे सामने पार पडतील,’ असं या पत्रकात म्हटले आहे. बाद सामना हा तिसऱ्या व चौथ्या संघांमध्ये होईल. हा सामना हरणारा संघ स्पर्धेतून बाद होईल. (IPL 2025 Play-off)

(हेही वाचा – रामपूरमधील तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण; ‘ATS’ने देखरेखीनंतर पकडलेल्या हेराबाबत धक्कादायक माहिती उघड)

तर आयपीएलची रंगत वाढवणारे पुढील दोन सामने हे अहमदाबादला होणार आहेत. १ जूनला बाद सामन्यातील विजेता संघ आणि पहिल्या पात्रता सामन्यातील पराभूत संघ एकमेकांशी भिडतील. आणि हा सामना जिंकणारा संघ हा अंतिम फेरीत जाईल. अंतिम सामना एका दिवसाच्या विश्रांतीनंतर ३ जूनला अहमदाबादलाच खेळवण्यात येईल.

(हेही वाचा – School Bus Terror Attack : बलुचिस्तानात शाळेच्या बसवर आत्मघातकी हल्ला; ४ मुलांचा मृत्यू तर ३८ जण जखमी)

आयपीएलच्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, आधी बाद फेरीचे सामने हैद्राबाद आणि कोलकाता इथे होणार होते. हे दोन संघ आघीच्या हंगामात विजेते आणि उपविजेते होते. पण, भारत – पाक तणावामुळे एक आठवडा स्पर्धा स्थगित करावी लागली होती. त्यानंतर या दोन्ही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन बाद फेरीचं ठिकाण बदलण्यात आले आहे. बीसीसीआयने बदलेलं वेळापत्रक जाहीर केलं, तेव्हा मान्सूनचा अंदाज घेण्यासाठी बाद फेरीच्या सामन्याविषयी निर्णय घेतला नव्हता. पण, दक्षिणेत पाऊस सुरू आहे. आणि बंगळुरूमध्ये गेल्या आठवड्यातील सामना पावसात वाहून गेला होता. ते पाहता हैद्राबादमधील सामने हलवण्याचा निर्णय झाला. तीच परिस्थिती कोलकाता इथेही आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.