‘ओम प्रतिष्ठान’च्या ‘हिंदू ग्राहक जागृती अभियाना’ला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी आशीर्वाद दिले आहेत. गोवा येथे झालेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात (Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav) ‘ओम प्रतिष्ठान’चे संस्थापक संचालक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना हिंदू ग्राहक जागृती अभियानाची माहिती दिली. यावेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘ओम प्रतिष्ठान’च्या या कार्याला आशीर्वाद दिले. (Hindu)
(हेही वाचा – Kejriwal Government : दिल्लीत शिक्षण संस्था स्थापन करण्याचे दावे पोकळ?; भाजपने कोणते आरोप केले आहेत ते जाणून घ्या)
हिंदू ग्राहक जागृती अभियानाचा शंखनाद
गोवा येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात हिंदू ग्राहक जागृती अभियानाचा शंखनाद झाला. यावेळी रणजित सावरकर म्हणाले की, ‘हिंदू भारतात अल्पसंख्य झाले तर त्यांना जाण्यासाठी जगात हिदूंचा एकही देश नाही. त्यामुळे येणार्या काळात देशात हिंदूंची सत्ता असायला हवी. सद्यस्थितीत मुसलमानांनी भारतातील अर्थकारणावर पकड घट्ट केली आहे. त्यामुळे हिंदूंनी हिंदूंसमवेत आर्थिक व्यवहार करायला हवा. यासाठी ‘ओम प्रतिष्ठान’द्वारा हिंदू उद्योजकांचे ‘हिंदू शुद्धता मानक प्रमाणपत्रा’द्वारे तसेच हिंदू ग्राहकांचे ‘हिंदू जागृती अभियाना’द्वारे संघटन होणे आवश्यक आहे.
प्रसादालयामध्ये ओम प्रमाणपत्र
सनातन संस्थेच्या गोवा येथील आश्रमाच्या प्रसादालयामध्ये ओम प्रमाणपत्र लावण्यात आले आहे. आता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ‘हिंदू ग्राहक जागृती अभियाना’लाही आशीर्वाद दिले आहेत.
हिंदूंना धोक्याची जाणीव करून देण्यासाठी ग्राहक जागृती अभियान
हिंदूंपासून हिंदूपर्यंत ही ओम प्रतिष्ठानची संकल्पना आहे. आता हिंदूंच्याच अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. तो जाणून घेऊन आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी ओम प्रमाणपत्र वितरीत केले जात आहे. तसेच हिंदू ग्राहक अभियानाच्या माध्यमातून हिंदूंची ग्राहक म्हणून नोंदणी केली जात आहे. ‘संख्याबळ हीच हिंदूंची शक्ती असते’, या सावरकरांच्या विचारांना अनुसरून मुख्यत्वे हिंदू संघटनाचे कार्य केले जात आहे. आपण सर्वांनी जात-पात, पंथ, प्रांत, भाषा यांच्या पलिकडे जाऊन हिंदू म्हणून एक होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदू व्यावसायिकांनी आणि हिंदू ग्राहकांनी मोठ्या संख्येने www.ompratishthan.org वर नोंदणी करावी, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आणि ओम प्रतिष्ठानच्या संस्थापक मंजिरी मराठे यांनी केले आहे.
(हेही वाचा – Palghar RTO : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास शासनाची मंजुरी)
‘हिंदू ग्राहक जागृती अभियाना’त सहभागी होण्यासाठी, हिंदू ग्राहक म्हणून नोंदणी करण्यासाठी ९०९०७१७१८७ या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच आपल्या आप्तस्वकीयांनाही ग्राहक म्हणून नोंदणी करायला सांगावे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community