Palghar RTO : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास शासनाची मंजुरी

204
Palghar RTO : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास शासनाची मंजुरी
  • प्रतिनिधी

आदिवासीबहुल पालघर जिल्ह्याच्या विकासात एक महत्त्वाचा टप्पा ठरवत, राज्य सरकारने पालघर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे पालघरला MH-60 ही नवी परिवहन ओळख मिळाली असून, स्थानिक जनतेच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला आहे. ही माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते म्हणाले की, “९ एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यात झालेल्या लोकदरबारात मी पालघरकरांना RTO कार्यालयाच्या मंजुरीचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने हे आश्वासन पूर्णत्वास नेले आहे.” (Palghar RTO)

(हेही वाचा – Mumbai BJP च्या अध्यक्षपदावर कोण? राजकीय खेळात नवा ट्विस्ट!)

नव्या उपप्रादेशिक कार्यालयामुळे पालघर जिल्ह्यातील नागरिकांना आता वाहन नोंदणी, परवाने, वाहन तपासणी यांसारख्या कामांसाठी वसई-विरारकडे धाव घ्यावी लागणार नाही. परिणामी वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठी बचत होणार आहे. परिवहन मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष आभार मानले असून, शासन निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याची माहितीही दिली. MH-60 या नवीन ओळखीने पालघर जिल्ह्याचा वेगळा प्रशासकीय व विकासात्मक चेहरा निर्माण होणार असून, यामुळे स्थानिकांना अधिक सुकर सेवा आणि गतिमान प्रशासन अनुभवता येणार आहे. (Palghar RTO)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.