-
प्रतिनिधी
“झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये पारदर्शकता, गती आणि जबाबदारी या त्रिसूत्रीवर आधारित नव्या धोरणाची अंमलबजावणी होणार आहे,” अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी मांडली. झोपडपट्ट्यांच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र शासनाच्या जमिनीचा वापर करत संयुक्त योजनांची आखणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले, “झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) आणि केंद्र शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधून निधी उभारण्याचा मार्ग खुला करण्यात येणार आहे.” या नव्या धोरणात माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून रिअल-टाइम मॉनिटरिंग, निधी व्यवस्थापन आणि लाभार्थी निश्चिती हे घटक पारदर्शक आणि नियंत्रणक्षम बनवले जाणार आहेत.
(हेही वाचा – ‘Rahul Gandhi हे आधुनिक काळातील मीर जाफर’, असीम मुनीरसोबतचा हाफ फोटो शेअर करत भाजपाने साधला निशाणा)
क्लस्टर पुनर्विकासाला प्रोत्साहन
उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी यावेळी झोपडपट्ट्यांच्या संपूर्ण पुनरुज्जीवनासाठी क्लस्टर पुनर्विकास धोरण राबवण्याची घोषणा केली. ते म्हणाले, “विलंबित प्रकल्पांची नवी घडी बसवून, सक्षम आणि जबाबदार विकासकांची निवड निविदा प्रक्रियेतून केली जाईल. यामुळे अपयशी प्रकल्पांवर लगाम बसेल आणि गैरप्रकार होण्याची शक्यता संपुष्टात येईल.”
प्रगती न झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचे पुनरावलोकन करून, नव्याने काम करणाऱ्या विकासकांद्वारे त्यांना नवसंजीवनी देण्यात येईल. यामुळे लाखो झोपडपट्टीवासीयांच्या आयुष्यात मूलभूत बदल घडून येणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा – Pune Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंगची पुनरावृत्ती टळली; पुण्यात ३ ठिकाणी होर्डिंग कोसळले अन्…)
एकात्मिक यंत्रणा आणि उत्तरदायित्वाचे धोरण
झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये अंमलबजावणीचा गतीमान आणि सक्षम आराखडा हे या नव्या धोरणाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. “हे धोरण केवळ इमारती उभ्या करण्यापुरते मर्यादित नसून, एक उत्तरदायी आणि मानवी केंद्रित पुनर्विकासाची दिशा देणारे ठरणार आहे,” असे उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले.
या धोरणामुळे झोपडपट्टी पुनर्वसनाच्या क्षेत्रात नवीन विश्वास, नवी कार्यसंस्कृती आणि नव्या तंत्रज्ञानासह झोपडपट्टीवासीयांसाठी एक उज्वल भविष्य घडेल, असा आशावाद शासनाने व्यक्त केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community