कल्याणमधून एक गंभीर घटना समोर आली आहे. चार मजली रहिवासी इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. या घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काही जण ढिगाऱ्या खाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये तीन महिलांसह एका दीड वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. श्री सप्तश्रृंगी असं स्लॅब कोसळलेल्या या इमारतीचं नाव आहे. कल्याण पूर्वेतील करपेवाडी भागात चिकणीपाडा परिसरात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. (Kalyan)
(हेही वाचा – ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या शिष्टमंडळावरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य; Shashi Tharoor यांना वगळणार?)
दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला
अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब तळमजल्यावर कोसळला होता. स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली काही लोक दबले गेले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पालिका अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गेल्या तीन तासांपासून या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत आठ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. त्यातील चार जणांचा मृत्यू झाला असून, चार जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असल्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरुच आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community