“युद्ध आणि कब्जा सुरू ठेवण्यासाठीच रशियाचा वेळकाढूपणा”; युक्रेनचे अध्यक्ष Volodymyr Zelenskyy यांचा गंभीर आरोप

'युध्द आणि कब्जा सुरू ठेवण्यासाठीच रशियाचा वेळकाढूपणा सुरू असून याकरिता राजनैतिकतेचा वापर केल्याचा गंभीर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की(Volodymyr Zelenskyy) यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर केला आहे.

48

युध्द आणि कब्जा सुरू ठेवण्यासाठीच रशियाचा वेळकाढूपणा सुरू असून याकरिता राजनैतिकतेचा वापर केल्याचा गंभीर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की(Volodymyr Zelenskyy) यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर केला आहे. ते पुढे म्हणाले, त्याच राजनैतिक दबावाने रशियाला आक्रमक भूमिका बदलण्यास भाग पाडले जाईल. याकरिता आम्ही शांतता प्रस्थापित करू इच्छिणाऱ्या मित्र राष्ट्रांसोबत चर्चा सुरू असल्याचेही अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले.

(हेही वाचा ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या शिष्टमंडळावरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य; Shashi Tharoor यांना वगळणार? )

ते पुढे म्हणाले, रशिया-युक्रेन युद्ध वाटाघाटीच्या चर्चांवरच संपले पाहिजे यात कुठलीही शंका नाही. चर्चेवरील प्रस्ताव स्पष्ट आणि वास्तववादी असले पाहिजेत, असेही ते म्हणाले. युक्रेन कोणत्याही वाटाघाटीच्या स्वरूपासाठी तयार असून आम्हाला युध्दावर पूर्णविराम हवा आहे असे सांगतानाच जर रशिया अवास्तव अटी मांडत राहिला, आमच्या विकासात अडथळा आणत राहिला तर त्याचे कठोर परिणाम रशियाला भोगावे लागतील, अशी परखड भूमिका युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की(Volodymyr Zelenskyy) यांनी मांडली.

रशियाकडून युध्दासाठी वेळ विकत घेण्याचा प्रयत्न – युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की

‘एक्स’वरील पोस्टमध्ये युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की(Volodymyr Zelenskyy) यांनी म्हटले की, “फिनलंडचे अध्यक्ष अलेक्जेंडर स्टब यांच्याशी चर्चा केली. आम्ही एकमेकांना भागीदारांसोबतच्या संपर्कांबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत कालच्या संभाषण तपशीलांवर चर्चा केली. मुख्य मुद्दा असा आहे की, शांततेसाठी उद्देशित राजनैतिकता चांगल्या प्रकारे समन्वयित आणि मूर्त परिणामांवर केंद्रित असली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळांना परराष्ट्र सचिव Vikram Mistry वस्तुस्थिती सांगणार ! )

ते पुढे म्हणतात, एक गोष्ट स्पष्ट आहे की, रशियाकडून युद्ध आणि कब्जा सुरू ठेवण्यासाठी वेळ विकत घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दबावामुळे रशियन नागरिकांना त्यांची भूमिका बदलण्यास भाग पाडले जाईल याची खात्री करण्यासाठी आम्ही आमच्या भागीदारांसोबत काम करत आहोत. निर्बंध महत्त्वाचे असून रशियाला युद्धासाठी जबाबदार बनविणाऱ्या प्रत्येकाचा मी आभारी आहे, असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की(Volodymyr Zelenskyy) यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.(Volodymyr Zelenskyy)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.