
सनातन संस्थेतर्फे आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ या भव्य धार्मिक-सांस्कृतिक महोत्सवात कोल्हापूरस्थित ‘सव्यासची गुरुकुलम’ संस्थेने युद्धकला, स्वसंरक्षण आणि शौर्यप्रदर्शनाचे सजीव आणि रोमांचक प्रात्यक्षिक सादर केले. त्यातून महोत्सवात सहभागी झालेल्यांमध्ये वीरश्री निर्माण झाली. (Shankhnad Mahotsav 2025)
(हेही वाचा – ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या शिष्टमंडळावरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य; Shashi Tharoor यांना वगळणार?)
यामध्ये ‘पारंपरिक मैदानी खेळ आणि युद्धकला तंत्र’; ‘शिवकालीन शौर्यप्रदर्शन व अंगकौशल्य’; ‘महिलांवर होणाऱ्या छेडछाडीच्या प्रसंगी तिने कशाप्रकारे आत्मरक्षण करावे याचे वास्तवदर्शी प्रात्यक्षिक’; ‘अनेकांनी मिळून महिलेवर आक्रमण केल्यास तीने कशा प्रकारे धैर्याने लढा द्यावा, याचे सजीव दर्शन’ या सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षकांच्या मनात वीरश्रीची आणि आत्मरक्षणाची जाणीव प्रबळ झाली. असे प्रशिक्षण सर्वांनी घेणे आवश्यक आहे, असा संदेश या सादरीकरणातून प्रभावीपणे पोहोचला. या वेळी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी यांनी आपल्या भाषणात सांगितले, “प्रत्येक संतांनी आपल्या शिष्यांना अशा प्रकारचे युद्धकला आणि आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे.” (Shankhnad Mahotsav 2025)
(हेही वाचा – IPL 2025 : ‘हा’ ६ फूट ८ इंच उंचीचा तेज गोलंदाज बंगळुरू संघाच्या ताफ्यात)
हा महोत्सव तब्बल वीस हजारांहून अधिक धर्मप्रेमी नागरिक, तसेच अनेक संत, महंत व आध्यात्मिक मार्गदर्शकांच्या उपस्थितीत पार पडला. या सजीव युद्धकला सादरीकरणाने महोत्सवातील वातावरण अधिक उर्जादायी व प्रेरणादायक बनवले. सव्यासची गुरुकुलम ही संस्था युवकांमध्ये आत्मविश्वास, राष्ट्रप्रेम आणि सनातन शौर्यपरंपरेची बीजे रोवण्याचे कार्य करत आहे. (Shankhnad Mahotsav 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community