
महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला लोहगड किल्ला हा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचा एक अद्भुत पुरावा म्हणून उभा आहे. लोहगड किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून १,०३३ मीटर म्हणजेच ३,३८९ फूट एवढी आहे. हा किल्ला म्हणजे नैसर्गिक सौंदर्याचं आणि मानवी कल्पकतेचं एक अद्वितीय मिश्रण आहे. शतकानुशतकांचा इतिहास आणि संशोधकांना मोहित करणारी वास्तुकला यामुळे लोहगड हा किल्ला इतिहासप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी एक आदर्श ठिकाण आहे. (lohagad fort)
लोहगड किल्ल्याचा इतिहास
लोहगड किल्ल्याचा समृद्ध भूतकाळ हा कित्येक राजवंशांच्या राजवटींनी विणलेला आहे. १० व्या शतकामध्ये लोहतामिया नावाच्या राजवंशाच्या काळामध्ये हा किल्ला उभारला गेला. त्यानंतर तो लवकरच नंतरच्या युगांच्या सर्व शासकांसाठी एक प्रतिष्ठित पुरस्कार बनून राहिला. कालांतराने हा किल्ला चालुक्य, राष्ट्रकुट, यादव, बहामनी, निजाम, मुघल आणि मराठे यांच्या राजवटीचा साक्षीदार बनला. या प्रत्येक राजवटीने लोहगडाच्या सामरिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर अमिट छाप सोडली आहे. (lohagad fort)
१६४८ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड किल्ल्याचं संरक्षणात्मक आणि सामरिक महत्त्व ओळखून तो किल्ला ताब्यात घेतला. पण १६६५ साली पुरंदरच्या तहादरम्यान त्यांना तो किल्ला मुघलांना सोपवावा लागला. पण तरीही महाराजांनी निराश न होता १६७० लोहगड किल्ला परत स्वराज्यात सामील करून घेतला. (lohagad fort)
(हेही वाचा – Chhagan Bhujbal यांचे सत्तेत दमदार पुनरागमन; जयंत पाटलांना जबर धक्का, राष्ट्रवादीत नवा स्फोट?)
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या यशस्वी सुरत मोहिमेत जिंकलेली संपत्ती साठवण्यासाठी या किल्ल्याचा वापर तिजोरी म्हणून केला होता. पुढे पेशव्यांच्या काळामध्ये नाना फडणवीस यांनी लोहगडावर आश्रय घेतला. इथे त्यांनी पाण्याचा एक मोठा टाका आणि पायऱ्यांची विहीर यांसारख्या आवश्यक संरचना बांधून घेतल्या. या संरचना अजूनही इतिहासाच्या मूक साक्षीदार आहेत. (lohagad fort)
लष्करी भूमिकेव्यतिरिक्त लोहगड किल्ल्याचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व देखील आहे. सप्टेंबर २०१९ साली पुण्यातल्या ट्रेकर्सच्या एका गटाला किल्ल्याच्या दक्षिणेकडच्या बाजूला असलेल्या गुहेमध्ये एक प्राचीन शिलालेख सापडला. हा शिलालेख इ.स.पू. दुसऱ्या किंवा पहिल्या शतकातला असून जैन ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेला होता. या शिलालेखामुळे लोहगडच्या इतिहासात आणखी एक थर जोडला गेला. (lohagad fort)
पर्यटक या किल्ल्यावर कोणता अनुभव घेऊ शकतात?
साहसप्रेमींसाठी लोहगड किल्ला हा एक रोमांचक पण सुलभ ट्रेकिंगचा अनुभव देतो. इथला सर्वांत लोकप्रिय ट्रेल सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या माळवली नावाच्या रेल्वे स्थानकापासून सुरू होतो. हा ट्रेक २ ते ३ तासांचा आहे. तो अतिशय सुंदर अशा भूभागावरून आणि प्राचीन भाजा लेण्यांमधूनही जातो. त्यामुळे या प्रवासाला एक समृद्ध सांस्कृतिक जोड मिळते. (lohagad fort)
याव्यतिरिक्त सोपा मार्ग पसंत करणाऱ्यांसाठी लोहगडवाडी नावाच्या गावातून एक रस्ता किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जातो. या रस्त्यावरून कारनेही जाता येतं. या रस्त्यावरून वर्षभर केव्हाही जाता येतं. (lohagad fort)
(हेही वाचा – best marathi comedy movies 2025 : २०२५ मध्ये तुम्हाला या मराठी चित्रपटांनी खूप हसवलंय; यापैकी तुम्ही कोणता चित्रपट पाहिला आहे?)
लोहगड किल्ल्याला पावसाळ्यातच का भेट द्यावी?
जून ते सप्टेंबर या दरम्यान पावसाळ्यामध्ये किल्ला आणि आजूबाजूलं असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा हिरवळीने व्यापलेल्या असतात. तसंच या काळात उंचावरून वाहणारे धबधबे आणि ओढे निसर्गाच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. म्हणून निसर्गराजीची श्रीमंती पाहण्यासाठी पावसाळ्यात लोहगड किल्ल्यावर भेट द्यावी. पण तरीही या काळात पायवाटा निसरड्या आणि चालण्यासाठी कठीण असू शकतात. म्हणून ट्रेकर्सनी चढाई करताना काळजी घ्यावी. (lohagad fort)
याव्यतिरिक्त लोहगड किल्ल्याला भेट देण्यासाठी चांगला काळ हा ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान आहे. या काळात इथलं हवामान थंड आणि आल्हाददायक असतं. त्यामुळे ट्रेकिंगचा आनंद घेता येतो. पावसाळ्यानंतर इथल्या भूभागावर हिरवळ पसरलेली असते. धुक्यात न्हालेले डोंगर आणि निरभ्र आकाश मिळून नयनरम्य दृश्य तयार करतात. हा काळ निसर्गप्रेमी आणि साहसी ट्रेकर्सना फिरण्यासाठी आदर्श काळ आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत इथे उन्हाची तीव्रता जाणवते. या काळात इथलं वातावरण उष्ण आणि दमट असू शकतं. या काळात लोहगडावर ट्रेकिंग करणं हे थकवणारं असू शकतं. (lohagad fort)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community