‘Rahul Gandhi हे आधुनिक काळातील मीर जाफर’, असीम मुनीरसोबतचा हाफ फोटो शेअर करत भाजपाने साधला निशाणा

380
'Rahul Gandhi हे आधुनिक काळातील मीर जाफर', असीम मुनीरसोबतचा हाफ फोटो शेअर करत भाजपाने साधला निशाणा
'Rahul Gandhi हे आधुनिक काळातील मीर जाफर', असीम मुनीरसोबतचा हाफ फोटो शेअर करत भाजपाने साधला निशाणा
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. एकीकडे, सरकार या ऑपरेशनच्या यशाबद्दल देशात आणि परदेशात मोहीम राबवत आहे. दरम्यान, राहुल गांधी या कारवाईचा हिशेब मागण्यात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत आता भाजपाने कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधींची तुलना मीर जाफरशी केली आहे. (Rahul Gandhi)

(हेही वाचा – काशी, मथुराच नव्हे, तर प्रत्येक मंदिर मुक्तीसाठी हिंदूंचा सहभाग अत्यावश्यक; अधिवक्ता Vishnu Shankar Jain यांचे प्रतिपादन)

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदनही केले नाही. त्याऐवजी, कॉंग्रेसचे राहुल गांधी  वारंवार विचारत आहे की आपण किती विमाने गमावली तर या प्रश्नाचे उत्तर डीजीएमओच्या ब्रीफिंगमध्ये आधीच देण्यात आले आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?
या पोस्टसोबत अमित मालवीय यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा अर्धा चेहरा आणि राहुल गांधींचा अर्धा चेहरा दिसत आहे. दुसऱ्या एका पोस्टमध्ये ते म्हणतात की राहुल गांधी हे नव्या युगाचे मीर जाफर आहेत.

(हेही वाचा – Jyoti malhotra चौकशीदरम्यान ‘या’ प्रश्नांची उत्तर देणं टाळतेय ; काय आहेत नेमके प्रश्न?)
या संघर्षादरम्यान किती पाकिस्तानी विमाने पाडली किंवा नष्ट केली, हे शोधण्याचा राहुल गांधींनी एकदाही प्रयत्न केला नाही. राहुल गांधींना पुढे काय मिळणार? निशाण-ए-पाकिस्तान? या पोस्टसोबत मालवीय यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. यामध्ये पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा अर्धा चेहरा आणि राहुल गांधींचा अर्धा चेहरा दिसत आहे. दुसऱ्या एका पोस्टमध्ये ते म्हणतात की, राहुल गांधी हे नव्या युगाचे मीर जाफर आहेत, अशी बोचरी टीकाही अमित मालवीय यांनी केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.