-
प्रतिनिधी
राजकारणात कोण कधी पलटी मारेल याचा नेम नाही. मंगळवारी सकाळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आणि एकाच वेळी अनेक राजकीय समीकरणांना कलाटणी दिली. राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झालेल्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
(हेही वाचा – “भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू हरपला” ; Dr. Jayant Narlikar यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली)
या शपथविधीने सर्वाधिक धक्का बसला तो राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जयंत पाटील यांना. गेल्या वर्षीपासून भुजबळ यांच्या नाराजीच्या बातम्यांमुळे त्यांचे शरद पवार गटात प्रवेशाचे संकेत दिले जात होते. डिसेंबर २०२४ मध्ये मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यानंतर भुजबळांनी (Chhagan Bhujbal) “जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना” अशी स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. त्यावर जयंत पाटील यांनीही उघड संकेत दिले होते की भुजबळ त्यांच्याच गटात येणार. मात्र आजच्या शपथविधीने जयंत पाटलांच्या त्या अपेक्षांना मोठा झटका दिला आहे.
(हेही वाचा – भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळांना परराष्ट्र सचिव Vikram Mistry वस्तुस्थिती सांगणार !)
भुजबळांनी (Chhagan Bhujbal) माध्यमांशी बोलताना “ज्याचा शेवट चांगला, ते सगळं चांगलं,” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले. दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर जातीयवादाचा आरोप करत मंत्रिपदावर टीका केली आहे. मात्र भुजबळांचं मंत्रिमंडळात परतणं हे ओबीसी समाजासाठी महत्त्वाचं मानलं जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीला याचा फायदा होऊ शकतो, असा राजकीय अंदाज आहे. जयंत पाटील यांनीही एक सूचक ट्विट करत, “सरकारला नाशिकमध्ये भुजबळांनाच पालकमंत्री करावं लागेल,” असं म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातील समीकरणं आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत रणधुमाळी आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community