-
ऋजुता लुकतुके
आठवड्याभराच्या स्थगितीनंतर आयपीएल पुन्हा सुरू झाल्यावर पहिल्या दोन दिवसांतच बाद फेरीचे तीन संघ निश्चित झाले आहेत. गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पाठोपाठ श्रेयस अय्यरचा पंजाब किंग्जचा संघही बाद फेरीसाठी पात्र ठरला आहे. त्याबरोबरच या संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये एक अनोखा विक्रम केला आहे. तीन वेगवेगळ्या फ्रँचाईजींच बाद फेरीत नेतृत्व करणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे. २०१९ आणि २०२० मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. यात दुसऱ्या वर्षी त्याचा संघ उपविजेता ठरला होता. तर २०२४ मध्ये तो कोलकाता या लीग विजेत्या संघाचा कर्णधार होता. आता पंजाब किंग्जलाही त्याने बाद फेरीत नेलं आहे. (IPL 2025, Shreyas Iyer)
रविवारी राजस्थान रॉयल्सचा १० धावांनी पराभव केल्यावर पंजाब किंग्जचे १७ गुण झाले होते. ते सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाबरोबर १७ गुणांवर आहेत. त्यानंतर झालेल्या सामन्यांत गुजरात टायटन्सनी दिल्ली कॅपिटल्सचा १० गडी राखून पराभव केला आणि १८ गुणांसह त्यांनी बाद फेरी निश्चित केली. गुजरातच्या विजयाबरोबरच त्यांच्यासह पंजाब आणि बंगळुरूचं बाद फेरीतलं स्थानही पक्कं झालं. श्रेयसच्या नावावर हा विक्रम लागला. (IPL 2025, Shreyas Iyer)
(हेही वाचा – Indo – Pak Cricket : आशिया क्रिकेट परिषदेतून माघार घेणार नाही; बीसीसीआय सचिव यांचा इशारा)
फक्त नेतृत्वाच्या निकषावर तीन वेगवेगळ्या फ्रँचाईजींचं नेतृत्व करणारा श्रेयस हा पाचवा खेळाडू आहे. यापूर्वी स्टिव्ह स्मिथने राजस्थान रॉयल्स, पुणे वॉरियर्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघांचं नेतृत्व केलं आहे. तर कुमार संगकारा (पंजाब किंग्ज, डेक्कन चार्जर्स व सनरायझर्स हैद्राबाद), महेला जयवर्धने (पंजाब किंग्ज, कोची टस्कर्स केरळ, दिल्ली कॅपिटल्स) आणि अजिंक्य रहाणे (राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स व कोलकाता नाईटरायडर्स) यांनीही आपल्या आयपीएल कारकीर्दीत तीन वेगवेगळ्या फ्रँचाईजींचं नेतृत्व केलं आहे. (IPL 2025, Shreyas Iyer)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community