
- ऋजुता लुकतुके
एअरटेल हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं मोबाईल नेटवर्क आहे. पण, अलीकडे १०,००० च्या वर ग्राहकांनी मोबाईल नेटवर्क किंवा इंटरनेट सुरू नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. खासकरून सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास या तक्रारी सर्वाधिक होत्या. डेटाट्रॅकर (DataTracker) या वेबसाईटवर सर्वाधिक तक्रारी नवी दिल्ली (New Delhi) आणि त्या खालोखाल चेन्नईतून (Chennai) होत्या. गेल्या आठवड्यातही एअरटेल नेटवर्क काही ठिकाणी बंद होतं. कोईंबतूर, दिंडीगुल आणि थिस्सूर इथंही नेटवर्कच्या तक्रारी होत्या. (Airtel Network Issue)
तक्रार करणाऱ्यांपैकी ६६ टक्के लोकांनी मोबाईल पूर्णपणे बंद असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. तर २१ टक्के लोकांना एअरटेल नेटवर्कवर कॉल करता येत नव्हता किंवा त्यांच्यापर्यंत कॉल पोहोचत नव्हता. तर १३ टक्के तक्रारी या इंटरनेटशी संबंधित होत्या. अनेकांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला. तर एअरटेलने त्यावर काहीच उत्तर न दिल्यामुळे हा संताप वाढला होता. अखेर एअरटेलने आपली बाजू लोकांसमोर मांडली. (Airtel Network Issue)
Airtel network is down across India. Who all are facing this issue?#airtel | #networkissue pic.twitter.com/fbT6dZ5QIE
— Alak Paul (@AlakPaul13) May 13, 2025
Compliment across Hyderabad, Chennai, Bengaluru, Madurai, and other places in the South.
No reply from Airtel PR@Airtel_Presence #AirtelDown https://t.co/Ol1cVeRa30
— Bala vetrivel N (@vetrivel1996) May 13, 2025
‘तामिळनाडू आणि केरळातील काही भागामध्ये तांत्रिक अडचणींमुळे नेटवर्क सेवा विस्कळीत झाली आहे. पण, त्यावर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. आठवडाभरात सर्व सुरळीत होईल,’ असं एअरटेलने म्हटलं आहे. त्याचबरोबर तात्कालिक समस्या असेल तर ग्राहकांना काही सल्ले दिले आहेत.
(हेही वाचा – Latur Birth Certificate Scam: लातूरमध्ये जन्म दाखल्यांचा मोठा घोटाळा उघडकीस ! २,२५७ बांगलादेशींची बनावट जन्म प्रमाणपत्रे रद्द)
एअरटेलने सुचवलेले काही उपाय असे आहेत,
- तुमचा फोन चुकून एअरोप्लेन मोडवर नाही याची खात्री करून घ्या
- काही वेळा फक्त फोन रिस्टार्ट करून समस्या मिटू शकते. नेटवर्क (Network) पुन्हा सुरू होऊ शकतं.
- फोनची ऑपरेटिंग प्रणाली आणि एअरटेल ॲप अद्ययावत आहे याची खात्री करून घ्या. नसेल तर ते अपडेट करा.
- नेटवर्क सेटिंगमध्ये जाऊन फोन रिसेट करा.
- फोन रिसेट केल्यावरही तक्रार तशीच राहिली. तर फोन फॅक्टरी रिसेट करून बघा. त्यापूर्वी फोनमधील डेटा सुरक्षित ठेवा
- नेटवर्कची समस्या कायम असेल तर १२१ हा क्रमांक डायल करून एअरटेलच्या कस्टमर केअरशी संपर्क करा.
- ओपन नेटवर्क वेबसाईटवर जाऊन तुमची समस्या तुम्ही मांडू शकता
- एअरटेलशी संपर्क करून तांत्रिक समस्या असेल तर जाणून घ्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community