top 5 largest airport in india : ही आहेत भारतातील सर्वात मोठी विमानतळे; यादी पाहण्यासाठी क्लिक करा

19
top 5 largest airport in india : ही आहेत भारतातील सर्वात मोठी विमानतळे; यादी पाहण्यासाठी क्लिक करा

भारतातल्या पर्यटन उद्योगातल्या वाढीमुळे आणि वाढलेल्या शहरीकरणामुळे भारत केंद्र सरकारने विमान वाहतूक उद्योगाला चालना देण्यासाठी एक मानक योजना तयार केली आहे. या योजनेद्वारे भारतात सर्वांत मोठ्या विमानतळांची श्रेणी तयार केलेली आहे. या श्रेणीमध्ये उत्तम आतिथ्य आणि आरामदायी उड्डाण करण्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला भारतातल्या सर्वांत मोठ्या आणि व्यस्त असलेल्या विमानतळांची माहिती सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात….

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे हैद्राबाद इथे आहे. हे भारतातलं सर्वांत मोठं विमानतळ आहे. याचं क्षेत्रफळ सुमारे ५,५०० एकर एवढं आहे. इथे १.२ दशलक्ष एवढ्या प्रवाशांना हाताळण्यासाठी एक मोठा टर्मिनल आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या ई-बोर्डिंगला मान्यता देणारं हे भारतातलं पहिलं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं संचालन हे जीएमआर ग्रुप, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच एएआय आणि तेलंगणा सरकारद्वारे संयुक्तपणे केलं जातं. हे विमानतळ अलायन्स एअर, अमेझॉन एअर आणि इंडिगो या विमान कंपन्यांचं वाहतूक केंद्र आहे. (top 5 largest airport in india)

(हेही वाचा – Indo – Pak Cricket : आशिया क्रिकेट परिषदेतून माघार घेणार नाही; बीसीसीआय सचिव यांचा इशारा)

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजेच आयजीआय विमानतळ हे भारतातल्या सर्वात व्यस्त आणि मोठ्या विमानतळांपैकी एक आहे. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताची राजधानी दिल्ली इथे ५१०६ एकर एवढ्या भूभागावर पसरलेलं आहे.

या विमानतळावर टेकऑफ आणि लँडिंग व्यवस्थापित करण्यासाठी एअरपोर्ट कोलॅबोरेटिव्ह डिसीजन मेकिंग म्हणजेच ए-सीडीएम नावाची प्रगत प्रणाली वापरली जाते.

केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ

केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे स्थित आहे. हे भारतातलं तिसरं सर्वात मोठं विमानतळ आहे. हे विमानतळ ४,००० एकर एवढ्या भूभागावर पसरलेलं आहे. तसंच हे कर्नाटक राज्यातल्या क्लीनमॅक्स सोलरने विकसित केलेलं सौरऊर्जेवर चालणारं पाहिलं विमानतळ म्हणून उदयास आलं आहे.

हे विमानतळ एअर इंडिया, एआयएक्स कनेक्ट, अकासा एअर, अलायन्स एअर, डीएचएल एव्हिएशन, फेडेक्स एक्सप्रेस आणि विस्तारा या कंपन्यांचं विमान वाहतूक केंद्र आहे. (top 5 largest airport in india)

(हेही वाचा – marathi festival : महाराष्ट्रात कोणकोणते सण व उत्सव धुमधडाक्यात साजरे होतात? जाणून घ्या रंजक माहिती!)

दाबोलीम विमानतळ

दाबोलीम विमानतळ हे गोव्यात पणजी इथे स्थित आहे. या विमानतळाचं क्षेत्रफळ १,७००० एकर एवढं आहे. दाबोलीम विमानतळ हे एआयएक्स कनेक्ट आणि इंडिगो या कंपन्यांचं प्रमुख वाहतूक केंद्र आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता इथे सेवारत आहे. हे विमानतळ पूर्व आणि ईशान्य भारतातल्या लोकांसाठी प्राथमिक विमान वाहतूक केंद्र आहे. हे विमानतळ १,६४० एकर एवढ्या भूभागावर स्थित आहे. हे विमानतळ एअर इंडिया, एआयएक्स कनेक्ट, स्पाइसजेट, अलायन्स एअर आणि इंडिगो यांसारख्या वेगवेगळ्या विमान कंपन्यांचं प्रमुख केंद्र आहे. (top 5 largest airport in india)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.