भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळांना परराष्ट्र सचिव Vikram Mistry वस्तुस्थिती सांगणार !

भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळांना परराष्ट्र सचिव Vikram Mistry वस्तुस्थिती सांगणार !

85

भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळांना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री (Vikram Mistry) वस्तुस्थिती सांगणार आहेत. परराष्ट्र सचिव दोन टप्प्यात या शिष्टमंडळांना माहिती देणार आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री २० मे रोजी संजय झा, कनिमोझी आणि श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला माहिती देतील. त्यानंतर, उर्वरित ४ शिष्टमंडळांना २३ मे रोजी माहिती देणार आहेत. (Vikram Mistry)

हेही वाचा-लष्करप्रमुख Upendra Dwivedi राजस्थानच्या दौऱ्यावर; ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या सैनिकांची घेतली भेट

२० मे रोजी होणार असलेल्या चर्चेनंतर संबंधित शिष्टमंडळ २१ ते २३ मे दरम्यान परदेश दौऱ्यावर असतील, तर २३ मी रोजी होणार असलेल्या चर्चेनंतर ४ शिष्टमंडळ २३ मे ते २५ मे दरम्यान विविध देशांना भेट देतील. ७ शिष्टमंडळे जगातील ३२ देशांना भेट देतील आणि पाकिस्तान नेहमीच दहशतवादाला कसा प्रोत्साहन देत आहे हे स्पष्ट करतील. (Vikram Mistry)

हेही वाचा- Chhagan Bhujbal : भुजबळांची मंत्रिमंडळात एन्ट्री होताच टीकांचा भडिमार! अंजली दमानिया, मनोज जरांगे म्हणाले … 

या शिष्टमंडळांमध्ये विविध पक्षांच्या खासदारांचा समावेश करण्यात आला आहे. विदेश दौऱ्यापूर्वी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची बाजू मांडण्यासंदर्भात परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री या शिष्टमंडळांच्या प्रमुखांशी तसेच सदस्यांशी चर्चा करणार आहेत. साधारणपणे कुठल्या देशांसमोर बाजू कशी मांडावी याबाबत परराष्ट्र सचिव आणि शिष्टमंडळांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. (Vikram Mistry)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.