Gavaskar on Gambhir : सुनील गावसकरांनी गौतम गंभीरलाही डिवचलं

श्रेयस अय्यरचं श्रेय खाल्ल्याचा आरोप त्यांनी गंभीरवर केला आहे.

51
Gavaskar on Gambhir : सुनील गावसकरांनी गौतम गंभीरलाही डिवचलं
Gavaskar on Gambhir : सुनील गावसकरांनी गौतम गंभीरलाही डिवचलं
  • ऋजुता लुकतुके

पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) आपल्या संघाला यंदा बाद फेरीत प्रवेश मिळवून दिला आहे. सलग तीन हंगामात तीन वेगवेगळ्या संघांना बाद फेरीत नेण्याचा अनोखा विक्रम त्यामुळे श्रेयसच्या नावावर जमा झाला आहे. त्यानंतर दिग्गज कसोटीपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला (Gautam Gambhir) शालजोडीतली दिली आहे. २०२४ मध्ये श्रेयस कोलकाता नाईट रायडर्सचं (KKR) नेतृत्व करत होता. आणि फ्रँचाईजीने विजेतेपदही पटकावलं. पण, या विजयाचं श्रेय गंभीरने श्रेयसला मिळू दिलं नाही, अशी टीका गावसकर यांनी केली आहे. (Gavaskar on Gambhir)

‘गेल्या हंगामात कोलकाता फ्रँचाईजीने विजेतेपद पटकावलं, त्याचं पुरेसं श्रेय श्रेयसला मिळालं नाही. तो कर्णधार होता. मैदानातून सूत्र हलवत होता. आणि विजयाचं श्रेय हे मैदानात खेळाडूंकडून प्रत्यक्ष कामगिरी करून घेणाऱ्या खेळाडूचंच असतं, म्हणजे कर्णधाराचं. ते डगआऊटमध्ये बसलेल्या माणसाचां नसतं. पण, श्रेयसला ते श्रेय न मिळता दुसऱ्याच कुणाला तरी मिळालं,’ असं गावसकर स्टार स्पोर्ट्सवरील (Star Sports) कार्यक्रमात बोलताना म्हणाले. त्यांचा रोख हा सध्या भारताचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीरकडे (Gautam Gambhir) आहे. गंभीर गेल्यावर्षी कोलकाता फ्रँचाईजीचा मार्गदर्शक किंवा मेंटॉर होता. त्याच्या जोरावर त्याने भारतीय राष्ट्रीय संघाचं मुख्य प्रशिक्षकपदही मिळवलं. (Gavaskar on Gambhir)

(हेही वाचा – Rohit Sharma Net Worth : भारतीय कर्णधार रोहित शर्माला क्रिकेट, जाहिरातीतून किती पैसा मिळतो माहीत आहे?)

यंदा मात्र पंजाब किंग्जकडून श्रेयसला योग्य श्रेय मिळतंय. ते मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) खेचून घेत नाहीए, असं गावसकर म्हणतात. गेल्या हंगामात श्रेयसची फलंदाजी फारशी चांगली झाली नव्हती. त्यामुळे कोलकाता संघाने मेगा लिलावापूर्वी त्याला राखून ठेवलं नाही. पण, पंजाब किंग्जने सर्वाधिक २६ कोटी रुपये मोजून श्रेयसला खरेदी केलं. आणि ही चाल यशस्वी ठरली. श्रेयसने आतापर्यंत पंजाबसाठी ११ सामन्यांमध्ये ५० च्या सरासरीने ४०५ धावा केल्या आहेत. शिवाय संघाला खंबीर नेतृत्वही दिलं आहे. (Gavaskar on Gambhir)

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि रिकी पाँटिंग (Ricky Ponting) ही आयपीएलमधील यशस्वी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षकाची जोडी आहे. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळताना दोघांनी दोनदा दिल्लीला बाद फेरीत प्रवेश करून दिला. आणि एकदा उपविजेतेपदही पटकावलं होतं. आता पंजाबसाठी दोघं पुन्हा एकत्र आले आहेत. (Gavaskar on Gambhir)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.