अटारी-वाघा सीमेवर १२ दिवसांनी Beating Retreat Ceremony पुन्हा सुरू होईल, पण यावेळी…

79

सीमा सुरक्षा दलाने (BSF) मंगळवार 20 मे पासून पंजाबमधील भारत-पाक सीमेवर सर्वसामान्यांसाठी रिट्रीट सेरेमनी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) नंतर सुरक्षेच्या कारणास्तव हे काम बंद करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अटारी (अमृतसर), हुसैनीवाला (फिरोजपूर) आणि सदकी (फाझिल्का) सीमा चौक्यांवर दररोज संध्याकाळी होणारा हा समारंभ आता मंगळवारपासून जनतेसाठी पुन्हा सुरू करण्यात येत आहे. तसेच यावेळी काही बदल करण्यात आले आहेत. बीएसएफ (BSF) आणि पाकिस्तान रेंजर्समध्ये (Pakistan Rangers) पारंपारिक हस्तांदोलन आणि सीमा दरवाजे उघडले जाणार नाहीत. (Beating Retreat Ceremony)

मंगळवारी २० मे रोजी बिटींग रिट्रीट सेरेमनी होणार आहे, परंतू ती फक्त प्रसारमाध्यमांसाठी खुली असणार आहे. बुधवार २१ मेपासून सामान्य नागरिक ते पाहण्यासाठी येऊ शकतात, असे जालंधर येथील मुख्यालय असलेल्या पंजाब फ्रंटियरने सांगितले आहे. या कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ६ वाजता असणार आहे.

(हेही वाचा – लष्करप्रमुख Upendra Dwivedi राजस्थानच्या दौऱ्यावर; ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या सैनिकांची घेतली भेट)

मंगळवारपासून शेतकऱ्यांसाठी काटेरी तारांचे दरवाजे उघडतील. पंजाब सरकारचे मंत्री कुलदीप सिंग धालीवाल (Kuldeep Singh Dhaliwal) यांनी सोमवारी अजनाळ्याजवळील शाहपूर सीमेवर बीएसएफ अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना मिठाई आणि फळे देऊन त्यांचे मनोबल वाढवले. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे हा समारंभ पुढे ढकलण्यात आला. आता परिस्थिती पाहता ते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचा – Rohit Sharma Net Worth : भारतीय कर्णधार रोहित शर्माला क्रिकेट, जाहिरातीतून किती पैसा मिळतो माहीत आहे?)

मंगळवारपासून शेतकऱ्यांसाठी दरवाजे उघडतील
मंत्री धालीवाल म्हणाले की, आम्हाला आमच्या सैनिकांचा अभिमान आहे. त्यांनी सैनिकांना आश्वासन दिले की सरकार सर्वतोपरी मदत करेल. धालीवाल यांनी शाहपूर सीमेवर बीएसएफच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दलही बोलले. शेतकऱ्यांची जमीन काटेरी तारेच्या पलीकडे आहे. बैठकीनंतर धालीवाल यांनी घोषणा केली की मंगळवारपासून शेतकऱ्यांसाठी दरवाजे उघडतील. आता शेतकरी कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांच्या जमिनीवर जाऊ शकतील, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.