KEM Hospital : आशियाई देशांमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच मुंबईत दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. परंतु, त्या दोन रुग्णांचे मृत्यू हे कोरोनामुळे झाले नसून इतर गंभीर आजारांमुळे झाल्याचे मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) स्पष्ट केले आहे. (KEM Hospital)
(हेही वाचा – Chhagan Bhujbal : “ज्याचा शेवट चांगला…” ; मंत्रिपदाच्या घोषणेनंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया काय ?)
मिळालेल्या माहितीनुसार, केईम रुग्णालायतील ते दोन कोविडमुळे झाले नसून, सहव्याधीमुळे ते दगावले, असा दावा मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. दगावलेल्या १४ वर्षांच्या मुलीला मूत्रपिंडाचा दुर्मीळ आजार होता, तर ५४ वर्षीय महिलेला कर्करोग (Cancer) होता. या आजारांमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी निश्चित केले. हे रुग्ण मुंबईबाहेरील (सिंधुदुर्ग आणि डोंबिवली) येथे वास्तव्यास होते, अशी माहिती प्रशासनाने दिली. जानेवारी ते एप्रिलपर्यंत कोविड रुग्णांची (Mumbai Covid Patient) संख्या कमी आढळली.
रुग्ण अत्यंत कमी
‘कोविड-१९’ हा आजार आता एक प्रस्थापित आणि निरंतर आरोग्य समस्या म्हणून गणला जातो. या रोगाच्या विषाणूचे रुग्ण अत्यंत कमी प्रमाणात अधूनमधून आढळतात. गेल्या काही दिवसांत सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि इतर देशांमध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळले आहे, असे महापालिकेने म्हटले आहे.
(हेही वाचा – Covid 19 : पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला !)
सुविधा कोणत्या?
सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात २० खाटा, मुले आणि गरोदर स्त्रियांसाठी, तर ६० सामान्य खाटा सज्ज आहेत. कस्तुरबा रुग्णालयात २ अतिदक्षता खाटा आणि १० खाटांचा वॉर्ड सज्ज आहे, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
हेही पहा –