राजकारणातील अनुभवी खेळाडू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची आज मंत्रिपदासाठी शपथ घेणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. अन्न व पुरवठा खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
मात्र या घडामोडींच्या आठ दिवस आधीच सर्व काही ठरले होते, असा गौप्यस्फोट स्वतः भुजबळ यांनी आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत केला. “ज्याचा शेवट चांगला, त्यावेळी सगळंच चांगले वाटते,” असे सूचक उद्गार त्यांनी काढले आणि राजकीय वर्तुळात एक नवा रंग भरला.
(हेही वाचा – ‘फोनवरील तक्रार एफआयआर होणार’ ; वाढती सायबर फसवणूक टाळण्यासाठी Central government चे मोठं पाऊल)
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मंत्रिपदाबाबत चर्चा रंगल्या होत्या. विविध कारणांमुळे निर्णय विलंबाने होत असला, तरी अखेर त्यांच्या अनुभवाला आणि योगदानाला दाद देत मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात आले आहे.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे महाराष्ट्रातील जनतेसाठी ओळखले जाणारे नाव आहे. त्यांची प्रशासनातील आणि लोकसंपर्कातील कुशलता पाहता, अन्न व पुरवठा खात्याची धुरा त्यांच्या हाती देणे ही सरकारची महत्त्वपूर्ण पावले मानली जात आहे.
आजच्या शपथविधीनंतर भुजबळ पुन्हा एकदा सक्रिय आणि जबाबदार भूमिकेत दिसणार आहेत, हे निश्चित आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community