Jyoti Malhotra : देशाशी गद्दारी करणाऱ्यांना काय शिक्षा मिळते ? वाचा सविस्तर …

Jyoti Malhotra : देशाशी गद्दारी करणाऱ्यांना काय शिक्षा मिळते ? वाचा सविस्तर ...

94
Jyoti Malhotra : देशाशी गद्दारी करणाऱ्यांना काय शिक्षा मिळते ? वाचा सविस्तर ...
Jyoti Malhotra : देशाशी गद्दारी करणाऱ्यांना काय शिक्षा मिळते ? वाचा सविस्तर ...

हरियाणा राज्यातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra ) हिला देशातील संवेदनशील माहिती पाकड्यांना पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिला 17 मे रोजी अटक केली. पाकिस्तान अधिकाऱ्यांनी ती संवेदनशील माहिती पुरवत होती आणि पाकसाठी हेरगिरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. (Jyoti Malhotra )

हेही वाचा-नव्या धोरणांतर्गत अनधिकृत पार्किंग हटवण्याचा निर्णय; मंत्री Pratap Sarnaik यांची घोषणा

ज्योती मल्होत्रावर आधिकारिक गोपनीयता अधिनियम (ऑफिशियल सीक्रेट्स अॅक्ट-1923) च्या कलम तीन आणि चार अंतर्गत तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 152 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑफिशियल सीक्रेट्स अॅक्ट-1923 अंतर्गत अटक करण्यात आली आहे, तो एक अतिशय जुना कायदा आहे. या कायद्याचा इतिहास ब्रिटिश राजवटीपासून सुरू होतो. पूर्वी हा कायदा इंडियन ऑफिशियल सीक्रेट्स अॅक्ट (अॅक्ट XIV)-1889 या नावाने ओळखला जायचा. त्या काळात भारतीय क्रांतिकार्‍यांच्या समर्थनार्थ बोलणाऱ्या वृत्तपत्रांवर हा कायदा लागू केला जायचा. त्या काळात जे वृत्तपत्र ब्रिटिश राजवटीविरुद्ध बोलायचे, त्यांच्यावर या कायद्यांतर्गत कारवाई केली जायची. या कायद्याद्वारे त्यांचे तोंड बंद केले जायचे. (Jyoti Malhotra )

हेही वाचा- ‘सैन्यदलांच्या शौर्य आणि निपुणता…’; Operation Sindoor नंतर पहिल्यांदाच सीडीएस प्रमुखांच्या लष्करी तळांना भेटी

काळानुसार या कायद्यात बदल करण्यात आले आणि ऑफिशियल सीक्रेट्स अॅक्ट-1904 अस्तित्वात आला. पुढे काही वर्षांनंतर 1923 मध्ये या कायद्यात आणखी काही बदल करण्यात आले आणि ऑफिशियल सीक्रेट्स अॅक्ट-1904 अधिसूचित करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अश्विनी दुबे यांच्या मते, ज्योतीविरुद्ध ऑफिशियल सीक्रेट्स अॅक्ट-1904 च्या कलम 3 आणि 5 अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Jyoti Malhotra )

हेही वाचा- ‘गौरवशाली महाराष्ट्र दर्शन’चे मंत्रालयात भव्य उद्घाटन; एकाच छत्राखाली Maharashtra राज्याच्या ६५ वर्षांच्या इतिहासाचा प्रवास!

कलम 3चा वापर त्या व्यक्तींविरुद्ध केला जातो ज्यांच्यावर पूर्णपणे हेरगिरीचा आरोप आहे. कोणतीही व्यक्ती कोणत्याही कारणास्तव अशा ठिकाणी गेली, जिथे जाण्यास मनाई आहे किंवा जिथे जाण्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो, अशा वेळी हा कायदा लागू केला जातो. याशिवाय, जर कोणी व्यक्ती असे स्केच किंवा मॉडेल तयार केले जे शत्रूला कोणत्याही प्रकारे फायदा पोहोचवू शकेल, किंवा कोणताही गुप्त कोड व पासवर्ड दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर केला, तर त्याच्यावरही कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. (Jyoti Malhotra )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.