“गोली उन्होने चलाई थी पर धमाका हमने किया”, अशी प्रतिक्रिया ‘Operation Sindoor’वर भारतीय सैन्याने महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ऑपरेशन सिंदूर ही प्रतिक्रिया नव्हती तर एक नियोजनबध्द आणि ध्येय-केंद्रित स्ट्राईक होती. आमचा हेतू स्पष्ट होता. आम्हाला(भारतीय सैन्याला) शत्रू(पाकिस्तान)च्या दहशतवाद्यांचे पायाभूत सुविधा आणि भारतात घुसखोरीकरिता मदत करणाऱ्या चौक्या नष्ट करायच्या होत्या, असे भारतीय लष्कराच्या मेजर जवानाने एएनआयशी बोलताना सांगितले.(Operation Sindoor)
(हेही वाचा ‘Operation Sindoor’ची माहिती जगभर पोहोचविण्यास तृणमूल खासदार युसूफ पठाण यांचा नकार )
ते पुढे म्हणाले, मानसिक, रणनीतिक आणि लॉजिस्टिकदृष्ट्या भारतीय लष्कर पूर्णपणे तयार होतं. भारताकडे स्वदेशी प्रगत रडार प्रणाली आणि विविध लक्ष्य अधिग्रहण प्रणालीदेखील होत्या. याशिवाय, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सैनिकांचा उत्साह ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)च्या वेळी पाहायला मिळाला. तसेच, पाकिस्तानकडून भरपूर तोफखाना गोळीबार झाला असला तरी मी अभिमानाने सांगू शकतो की आमच्याकडून कोणतीही जीवितहानी झाली नाही, असेही मेजर जवानाने सांगितले.
(हेही वाचा Operation Sindoor : मुंबईत महिलांच्या नेतृत्वात ‘सिंदूर यात्रा’; १५०० महिलांचे सैन्याला अभिवादन )
ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)अंतर्गत भारतीय सैन्याचं ध्येय पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करणे. जेव्हा पाकिस्तानने आपल्या नागरी क्षेत्राला आणि लष्करी तळांना लक्ष्य करायला सुरूवात केली तेव्हाच भारताचा हेतू स्पष्ट होता, असेही भारतीय सैन्याने सांगितले. जर त्यांनी आमच्या गावावर गोळीबार केला तर आम्ही त्यांची चौकी देखील नष्ट करू. त्यांच्या प्रत्येक कारवाईला आमचं चोख प्रत्युत्तर असेल.
#WATCH | J&K: An Indian Army Major says, “Goli unhone chalayi thi par dhamaka humne kiya.”
He further says, “Operation Sindoor was not a reaction; it was a calculated and mission-oriented strike. Our intention was very clear: we had to destroy the enemy’s terror infrastructure… https://t.co/1Gbv3qQyoQ pic.twitter.com/2GwHpXiC3I
— ANI (@ANI) May 19, 2025
ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)दरम्यान पाकिस्तानी नागरिकांवर कुठलाही हल्ला करण्यात आला नाही. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानच्या चौक्याच नष्ट केल्या नसून त्यांचे मनोबलदेखील नेस्तानाबूत करण्यात आल्याचे मेजर जवान म्हणाले. भारतीय लष्कराकडे स्वतःचे असे क्षण होते आणि तेच महत्त्वाचे ठरले आहेत. ते पुढे म्हणाले, ऑपरेशन सिंदूरद्वारे आम्ही असे उत्तर दिले आहे की, ते हे नेहमीच लक्षात ठेवतील आणि भविष्यात काहीही करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतील, अशी परखड भूमिका भारतीय सैन्यातील मेजर जवानाने व्यक्त केली.(Operation Sindoor)
Join Our WhatsApp Community