IPL 2025, Shubman Gill : शुभमन गिलने दाखवून दिली कर्णधार म्हणून मनाची स्थिरता

IPL 2025, Shubman Gill : गुजरात टायटन्सला बाद फेरी गाठून देण्यात गिलने मोलाची भूमिका बजावली.

36
IPL 2025, Shubman Gill : शुभमन गिलने दाखवून दिली कर्णधार म्हणून मनाची स्थिरता
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये रविवारी गुजरात टायटन्सनी एकही गडी न गमावता २०० धावा केल्या आणि दिल्लीचा पराभव करत गुण तालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. त्याचबरोबर गुजरात, बंगळुरू आणि पंजाब या तीन संघांनी आता बाद फेरीत आपलं स्थानही निश्चित केलं आहे. गुजरातच्या विजयात साई सुदर्शन आणि शुभमन गिल ही सलामीची जोडी चमकली. साई सुदर्शनने नाबाद १०५ तर गिलने नाबाद ९३ धावा केल्या. (IPL 2025, Shubman Gill)

ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही हे दोघेच आता आघाडीवर आहेत. तर पहिल्या सहांत जोस बटलर हा आणखी एक गुजरातचा खेळाडू आहे. गुजरात इतक्या सहज बाद फेरीत कसं पोहोचलं हे दाखवणारी ही आकडेवारी आहे. सामना संपल्यानंतर गिलने केलेल्या सोशल मीडिया पोस्टमधूनही गुजरातच्या विजयाचं कारण अधोरेखित होतं. ‘सामन्यातील सर्व गोष्टींमध्ये शिस्त,’ असं एकच वाक्य गिलने लिहिलं आहे. (IPL 2025, Shubman Gill)

(हेही वाचा – चुकीच्या पद्धतीने सशुल्क वाहनतळाच्या कंत्राटाला मुदतवाढ; Adv. Makarand Narvekar यांनी केली ‘ही’ मागणी)

यंदा आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा संघ खरंच तपशीलवार चांगली कामगिरी करत आहे. आतापर्यंत अटीतटीचे सामने असोत किंवा मोठ्या आव्हानांचा पाठलाग असो गुजरात संघाने फारशा चुका केलेल्या नाहीत. पावसामुळे ऐनवेळी दोन षटकं कमी झालेला मुंबईतील मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना असो किंवा दिल्ली विरुद्ध २०० धावांचा पाठलाग असो, संघाने त्या वेळेला साजेशी कामगिरी करत विजय मिळवले आहेत. १२ सामन्यांतून ९ विजयांसह गुजरातचा संघ आता अव्वल आहे. गुजरातबरोबरच बंगळुरू आणि पंजाबनेही आता बाद फेरी गाठली आहे. गुजरात टायटन्सच्या विजयात आघाडीवर राहून संघाचं नेतृत्व करणारा शुभमन गिल लक्ष वेधून घेत आहे. (IPL 2025, Shubman Gill)

(हेही वाचा – Maharashtra Government : चालू आर्थिक वर्षाकरिता ४४ लाख ७६ हजार कोटींच्या पतपुरवठा आराखड्यास मान्यता)

२५ व्या वर्षी शुभमन गिल आपल्या कारकीर्दीच्या नवीन वळणावर आहे. टी-२० प्रकारात सर्वात जलद ५,००० धावा पूर्ण करणारा तो भारताचा दुसरा वेगवान फलंदाज आहे. संघात त्याने आपला जम बसवला आहे. एकदिवसीय प्रकारातही तो तिसऱ्या क्रमांकावर आपली उपयुक्तता सिद्ध करून आहे. आता कसोटीत आघाडीच्या फळीत त्याला जम बसवायचा आहे. आणि इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटींत तिथल्या उसळत्या खेळपट्ट्यांवर चांगली कामगिरी करणं हे त्याच्यासमोरचं आव्हान आहे. त्याचबरोबर गुजरात टायटन्सचं सुरुवातीपासून नेतृत्व करताना शुभमन गिलने कर्णधार म्हणूनही शांत आणि निश्चल वृत्ती दाखवून दिली आहे. भारतीय संघाचा कर्णधार म्हणूनही त्याचंच नाव चर्चेत आहे आणि गुजरातचं नेतृत्व करताना आपले नेतृत्व गुण दाखवून त्याने या पदावरही दावा ठोकला आहे. (IPL 2025, Shubman Gill)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.