
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
पार्किंग कंत्राटदारांना चुकीच्या पद्धतीने मुदतवाढ दिल्याच्या कारणावरून ए विभागाचे सहाय्यक अभियंता यांना निलंबित करण्यात आले आहे. परंतु, निलंबनानंतरही पे अॅण्ड पार्क सुविधा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू आहे. जर मुदतवाढ चुकीची होती आणि त्यासाठी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते, तर पे अॅण्ड पार्क सुविधा का बंद केली गेली नाही असा सवाल करत माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर (Adv. Makarand Narvekar) यांनी ए विभागातील वाहनतळ (पार्किंग) सर्व मुंबईकरांसाठी मोफत करा अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
(हेही वाचा – Operation Sindoor : मुंबईत महिलांच्या नेतृत्वात ‘सिंदूर यात्रा’; १५०० महिलांचे सैन्याला अभिवादन)
महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात नार्वेकर (Adv. Makarand Narvekar) यांनी म्हटले आहे की, बेकायदेशीरपणे या सुविधा सुरू ठेवण्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी मागणी मकरंद नार्वेकर यांनी केली. ए वॉर्डमधील अनियमित मुदतवाढ देऊन सुरू असलेल्या सर्व पे अॅण्ड पार्कच्या सुविधांना तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली. नवीन पार्किंग धोरण होईपर्यंत तसेच या पे अँड पार्कसाठी नवीन निविदा जारी होईपर्यंत सर्व मुंबईकरांसाठी पार्किंग मोफत करावे. नागरिकांना बेकायदेशीर मुदतवाढनुसार चालणाऱ्या सेवांसाठी पैसे देण्यास भाग पाडले जाऊ नये, असेही मकरंद नार्वेकर म्हणाले.
(हेही वाचा – 2 Matches in 2 Days : दोन दिवसांत वेगवेगळ्या देशांत दोन टी-२० सामने खेळण्याची किमया)
मकरंद नार्वेकर (Adv. Makarand Narvekar) पुढे म्हणाले की, महापालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या संगनमत आणि कथित भ्रष्टाचारासाठी जनतेला दंड आकारला जाऊ नये. जर बीएमसीने स्वतःच ही मुदतवाढ चुकीची आणि अवैध असल्याचे म्हटले आहे तर ही पार्किंग सेवा सुरू ठेवण्यातून महापालिकेच्या काही उच्चपदस्थ अधिकारी आणि कंत्राटदारांमध्ये संगनमत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे, असा आरोप नार्वेकर यांनी केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community