-
ऋजुता लुकतुके
क्रिकेटमध्येही आता टी-२० लीगचं युग अवतरलंय हे दाखवणारी एक घटना उघड झाली आहे. मुस्तफिझुर रेहमान हा खेळाडू शनिवारी शारजा आणि रात्रीत प्रवास करून रविवारी नवी दिल्लीत आपला दुसरा सामना खेळला आहे. म्हणजेच दोन दिवसांत दोन वेगळ्या देशांत, दोन वेगळ्या लीगमध्ये तो दोन सामने खेळला आहे. हा एक विक्रमच आहे. मुस्तफिझुरसाठी यातील एक सामना आंतरराष्ट्रीय होता. तर दुसरा सामना आयपीएलचा होता. (2 Matches in 2 Days)
बांगलादेशचा संघ सध्या युएईच्या दौऱ्यावर आहे आणि तिथे शनिवारी शारजा इथं दोन देशांदरम्यान मालिकेतील शेवटचा टी-२० सामना खेळवण्यात आला. रेहमानने १७ धावांत २ बळी मिळवत आपल्या संघाला हा सामना जिंकून देण्यात मोठा हातभार लावला. बांगलादेशने हा सामना २७ धावांनी जिंकला. त्यानंतर मुस्तफिझुर रेहमानला २४ तासांत आपला पुढील सामना नवी दिल्लीत खेळायचा होता. त्यासाठी शारजाहून दिल्ली असा २,००० किलोमीटरचा प्रवासही करावा लागणार होता. (2 Matches in 2 Days)
(हेही वाचा – ‘काँग्रेस खासदाराला पाकिस्तानी गुप्तचर संस्थेकडून प्रशिक्षण’; आसामचे मुख्यमंत्री Himanta Biswa Sarma यांचा खळबळजनक दावा)
पण, डावखुरा तेज गोलंदाज वेळेत दिल्लीला पोहचला आणि दिल्ली कॅपिटल्सकडून तो सामन्यातही खेळला. आयपीएल स्थगित झाल्यानंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं कारण देत मिचेल स्टार्क आयपीएलला परतला नाही. त्यामुळे उर्वरित सामन्यांसाठी ऐनवेळी दिल्लीने मुस्तफिझूर रेहमानला करारबद्ध केलं आहे. संघाला निकड असताना रातोरात प्रवास करून रेहमान दिल्लीत पोहोचला. या सामन्यात रेहमानने ३ षटकं टाकली आणि त्यात २४ धावा दिल्या. दिल्लीने समोर ठेवलेलं २०० धावांचं आव्हान गुजरातने अगदी आरामात १० गडी राखून पार केलं. त्याचबरोबर गुजरात टायटन्सचा संघ बाद फेरीतही पोहोचला आहे. (2 Matches in 2 Days)
मुस्तफिझुर रेहमानने दाखवलेल्या व्यावसायिकतेचं मात्र सगळीकडे कौतुक होतंय. दिल्लीचा पुढील सामना येत्या बुधवारी मुंबईत मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. दिल्ली संघ सध्या पाचव्या स्थानावर असला तरी त्यांना बाद फेरी गाठण्याची चांगली संधी आहे. त्यासाठी मुंबईबरोबरच त्यांची टक्कर असणार आहे. (2 Matches in 2 Days)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community