परिवहन विभागातील १५९ ऑनलाईन बदल्यांना गती; मंत्री Pratap Sarnaik यांचा सुसूत्रतेचा आग्रह

62
परिवहन विभागातील १५९ ऑनलाईन बदल्यांना गती; मंत्री Pratap Sarnaik यांचा सुसूत्रतेचा आग्रह
परिवहन विभागातील १५९ ऑनलाईन बदल्यांना गती; मंत्री Pratap Sarnaik यांचा सुसूत्रतेचा आग्रह

प्रतिनिधी

Pratap Sarnaik : मोटार परिवहन विभागामध्ये पारदर्शकतेचा नवा अध्याय लिहित १५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या (IMV) ऑनलाईन बदल्या सोमवारी 19 मे रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत मंत्रालयात पार पडल्या. यावेळी मंत्री सरनाईक यांनी बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याचे आणि महिला अधिकाऱ्यांच्या अडचणी प्राधान्याने सोडवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. (Pratap Sarnaik)

(हेही वाचा – Illegal Infiltrators : केंद्रीय गृहमंत्रालयाचे राज्यांना महत्त्वाचे निर्देश; अवैध घुसखोरांवर ३० दिवसांच्या आत कारवाई करा)

बैठकीस परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, “ऑनलाईन बदल्यांमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना मागणीनुसार पसंती मिळत असून समाधानाचे प्रमाण वाढले आहे. भविष्यात अधिकाऱ्यांना ३ ऐवजी ५ पसंतीक्रम देण्यात आले, तर ही प्रक्रिया आणखी प्रभावी ठरेल.” ते पुढे म्हणाले, “विशेषतः महिला अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक अडचणींचा विचार करून निर्णय घेतले गेले पाहिजेत. पुढील वर्षीपासून बदल्यांची ही प्रक्रिया अधिक सुधारित आणि कार्यक्षम स्वरूपात राबवली जाणार आहे.”

(हेही वाचा – Shankhnad Mahotsav 2025 : ‘सनातन राष्ट्रा’साठी ‘रामराज्य संकल्प जपयज्ञा’द्वारे एक कोटी श्रीरामनामाचा जप !)

या बैठकीत गतवर्षी राबविलेल्या ऑनलाईन बदल्यांचा आढावा घेऊन त्यातील अनुभवांवर आधारित सुधारणा करण्यावर भर देण्यात आला. सरकारच्या डिजिटायझेशन धोरणाला अनुसरून परिवहन विभागात राबवली जात असलेली ही ऑनलाईन बदली प्रक्रिया इतर विभागांसाठीही मार्गदर्शक ठरत आहे. पारदर्शकता, कार्यक्षमता आणि कर्मचारी संतोष यांचा योग्य समन्वय साधणाऱ्या या योजनेला अधिक मजबुती देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.|

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.