काँग्रेस खासदार गौरव गोगोई(Gaurav Gogoi) पाकिस्तानला भेट देण्यासाठी नाही तर आयएसआय(ISI)कडून प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते, असा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा(Himanta Biswa Sarma) यांनी केला. आसाम मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने काँग्रेस खासदाराच्या पत्नीच्या दहशतवादी देशाशी असलेल्या संबंधांवर प्रश्न उपस्थित झाला आहे. खासदार गोगोई यांनी राफेल करारा(Rafale aircraft)ला विरोध करण्यासाठी पाकिस्तानी आस्थापनांशी संगनमत केले, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री सरमा यांनी केला.(Himanta Biswa Sarma)
(हेही वाचा पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीसोबत Jyoti Malhotra चा फोटो व्हायरल! )
आज मैं एक और तथ्य आपके सामने प्रस्तुत कर रहा हूँ-
कांग्रेस के सांसद पाकिस्तान में ISI के निमंत्रण पर गए थे। हमारे पास निमंत्रण पत्र से संबंधित दस्तावेज़ उपलब्ध हैं। pic.twitter.com/aSzEMfOL7g
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) May 18, 2025
दरम्यान, गौरव गोगोईवरील आरोपाबाबत आपला एकही शब्द खोटा ठरला तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईल, असे आव्हान मुख्यमंत्री सरमा(Himanta Biswa Sarma) यांनी दिले. ते पुढे म्हणाले, काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांचा पाकिस्तान दौरा पर्यटनासाठी नव्हता तर प्रशिक्षणासाठी होता. पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाकडून गोगोई यांना निमंत्रण मिळाले असून जे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचेही मुख्यमंत्र्यां(Himanta Biswa Sarma)नी म्हटले.
(हेही वाचा पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीसोबत Jyoti Malhotra चा फोटो व्हायरल! )
गुवाहाटी येथील एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा(Himanta Biswa Sarma) यांनी दावा केला की, खासदार गोगोई पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआय(ISI)च्या निमंत्रणावरून तिथे गेले होते. ते म्हणाले, आतापर्यंत मी कधीच इतके उघडपणे बोललो नव्हतो, पण आज पहिल्यांदाच मी स्पष्टपणे सांगत आहे की गौरव गोगोई आयएसआयच्या निमंत्रणावरून पाकिस्तानला गेला होता. मी खात्रीने सांगू शकतो की त्याला तिथे प्रशिक्षण मिळाले. गौरव गोगोई यांना पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाकडून एक पत्र मिळाले, त्यानंतरच ते पाकिस्तानला गेले, असे ते म्हणाले.(Himanta Biswa Sarma)
Join Our WhatsApp Community