
भारतात ‘रामराज्य’ हे केवळ एक धार्मिक आदर्श नव्हे, तर संस्कृती, नीती, आणि न्यायाधिष्ठित शासन व्यवस्थेचे प्रतीक मानले जाते. या महान उद्दिष्टाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘सनातन राष्ट्रा’साठी ‘रामराज्य संकल्प जपयज्ञा’द्वारे एक कोटी श्रीरामनामाचा जप सनातन संस्थेच्या वतीने फर्मागुडी, फोंडा, गोवा येथे आयोजित सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात करण्यात आला. (Shankhnad Mahotsav 2025)
(हेही वाचा – Jama Masjid ASI Survey : पुनःनिरीक्षण याचिका फेटाळत अलाहाबाद हायकोर्टाचा मुस्लिम पक्षाला मोठा दणका)
‘देशविदेशातून आलेल्या २० हजारपेक्षा अधिक भाविकांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असा नामजप केला. या जपयज्ञामुळे संपूर्ण वातावरण राममय झाले होते. या जपयज्ञाचा उद्देश म्हणजे राष्ट्राला अध्यात्मिक उर्जा देणे, नैतिक मूल्यांची पुनर्स्थापना करणे आणि सनातन हिंदू संस्कृतीचा जागर घडवणे. या यज्ञात देशभरातील साधक, भक्त, अध्यात्मप्रेमी व विविध धार्मिक संस्था सहभागी झाल्या. (Shankhnad Mahotsav 2025)
(हेही वाचा – Illegal Infiltrators : केंद्रीय गृहमंत्रालयाचे राज्यांना महत्त्वाचे निर्देश; अवैध घुसखोरांवर ३० दिवसांच्या आत कारवाई करा)
या जपयज्ञात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील २ हजार ५०० साधक, धर्मप्रेमी हिंदूंनी सहभाग घेतला. राष्ट्रीय व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर, दत्त संप्रदायाचे पू. प्रमोद केणे आणि आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांची जपयज्ञाला उपस्थिती लाभली. (Shankhnad Mahotsav 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community