-
ऋजुता लुकतुके
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराट कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयाविषयी नव्याने प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ‘मला विराटच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे आश्चर्य वाटलं,’ असं गांगुली कोलकात्यात ईडन गार्डन्सवर झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला. विराटने १२३ कसोटींमध्ये ४६ धावांच्या सरासरीने ९,२३० धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावावर ३० शतकं आणि ३१ अर्धशतकं आहेत. भारताकडून सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथा आहे. (Virat Kohli Retires)
(हेही वाचा – Shankhnad Mahotsav 2025 : संपूर्ण महाराष्ट्र वसेल इतके बांगलादेशी घुसखोर भारतात; रणजित सावरकर यांनी मांडले दाहक वास्तव)
मागच्याच आठवड्यात विराट कोहलीने अचानक आपला निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. त्यापूर्वी पाच दिवस आधी रोहित शर्मानेही कसोटीतून माघार घेतली होती. या दोन्ही अनुभवी खेळाडूंच्या निवृत्तीमुळे भारतीय संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हीच भावना सौरव गांगुलीनेही बोलून दाखवली. ‘निवृत्तीचा निर्णय खेळाडूंचा स्वत:चा असतो आणि हा निर्णयही विराटने स्वत: घेतलाय. पण, त्याची कारकीर्द भन्नाट होती. रोहितच्या बाबतीतही तेच म्हणता येईल,’ असं गांगुली म्हणाला. (Virat Kohli Retires)
(हेही वाचा – 11th Admission 2025: अकरावीसाठी प्रवेशाची लगबग; सोमवारपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू )
विराटची कसोटीतून निवृत्ती ही अलीकडे भारतीय संघातून झालेल्या निवृत्तीच्या मालिकेतील तिसरी मोठी निवृत्ती आहे. ऑस्ट्रेलियात बोर्डर – गावस्कर चषक स्पर्धा सुरू असताना फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने निवृत्ती जाहीर केली होती. ही मालिका संपल्यानंतर इंग्लंड दौऱ्यापूर्वी रोहित शर्मानेही आपली निवृत्ती जाहीर केली. आता विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघात मोठी पोकळी निर्माण होणार आहे. त्याविषयी गांगुलीने भाष्य केलं. नवीन कर्णधार निवडताना निवड समितीने खबरदारी घ्यावी असं त्याला वाटतं. ‘कर्णधाराची निवड ही दीर्घ काळासाठी असली पाहिजे. त्याचा विचार करून निवड समितीने नवीन कर्णधार निवडला पाहिजे. बुमराहच्या दुखापतीचा विचार झाला पाहिजे. अशा काही गोष्टींचा नीट विचार करून नवीन कर्णधार निवडावा,’ असं गांगुलीने म्हटलं. (Virat Kohli Retires)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community