Jama Masjid ASI Survey : पुनःनिरीक्षण याचिका फेटाळत अलाहाबाद हायकोर्टाचा मुस्लिम पक्षाला मोठा दणका

Jama Masjid ASI Survey :  संभलमधील वादग्रस्त जामा मशिदीच्या सर्वेक्षण प्रकरणावर पुन्हा एकदा अलाहाबाद उच्च न्यायालयात खटला चालविण्यात येणार आहे. दि. १३ मे रोजीच्या सुनावणीत वादविवाद पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.

65

Jama Masjid ASI Survey :  संभलमधील वादग्रस्त जामा मशिदीच्या सर्वेक्षण प्रकरणा(Jama Masjid ASI Survey)वर पुन्हा एकदा अलाहाबाद उच्च न्यायालयात खटला चालविण्यात येणार आहे. दि. १३ मे रोजीच्या सुनावणीत वादविवाद पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर सोमवारी पार पडलेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने यासंदर्भात निकाल दिला आहे. विशेष म्हणजे दिवाणी न्यायालयाने संभल जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. याविरोधात मशिदीच्या इंतेजामिया समितीने दाखल केलेली पुनःनिरीक्षण याचिका हायकोर्टाने फेटाळली.

(हेही वाचा ‘Operation Sindoor’ची माहिती जगभर पोहोचविण्यास तृणमूल खासदार युसूफ पठाण यांचा नकार )

दरम्यान, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण(एएसआय)ने दि. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी पहिल्यांदाच सर्वेक्षण केले होते. त्यानंतर दि. २४ नोव्हेंबर रोजी पुन्हा सर्वेक्षण सुरू झाले. त्या दिवशी संभलमध्ये हिंसाचार होऊन ४ लोकांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले होते. यानंतर दि. ०८ जानेवारी २०२५ रोजी उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन सर्वेक्षणाला स्थगिती दिली. तसेच, सर्व विरोधी पक्षांकडून उत्तरेदेखील न्यायालयात मागितली गेली.

२५ फेब्रुवारी २०२५ रोजी मशीद समितीची याचिका

जामा मशिदीला रंगरंगोटी करण्याकरिता उच्च न्यायालयात दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी वकील झहीर असगर यांनी याचिका दाखल केली होती. दरवर्षी आम्ही रमजानपूर्वी मशिदीला रंगवतो, पण यावेळी प्रशासन परवानगी देत ​​नाही, असे याचिकेत म्हटले गेले. परंतु, हिंदू पक्षकारांनी त्यास विरोध करत मंदिराचे पुरावे रंगवून आणि पांढरे करून पुसले जाऊ शकतात म्हणून परवानगी देऊ नये, असे न्यायालयासमोर सांगितले. दरम्यान, २७ फेब्रुवारीला पहिल्या सुनावणीत न्यायालयाने ३ सदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश देताना मशिदीचे मुतल्वी आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांचाही समावेश होता. समितीला मशिदीची तपासणी करून २४ तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

२ जानेवारी २०२५ रोजी सर्वेक्षण अहवाल न्यायालयात दाखल

दि. ०२ जानेवारी २०२५ रोजी चंदौसी न्यायालयात संभल येथील जामा मशिदीचा ४५ पानांचा सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. साडेचार तासांची व्हिडिओग्राफी आणि १ हजारांहून अधिक फोटोज् देखील न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यानंतर आता मशिदीआधी मंदिर असल्याचे पुरावे सापडल्याचा दावार न्यायालयात करण्यात आला. सर्वेक्षण अहवालानुसार, मशिदीत ५० हून अधिक फुले, चिन्हे आणि कलाकृती सापडल्या आहेत. आत २ वडाची झाडे आहेत. हिंदू धर्मात वडाच्या झाडाची पूजा केली जाते. एक विहीर आहे, तिचा अर्धा भाग मशिदीच्या आत असून अर्धा बाहेर आहे.

(हेही वाचा Hyderabad मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट पोलिसांनी उधळला; ISIS सोबत संपर्कात असलेल्या दोघांना ठोकल्या बेड्या   )

महत्त्वाचे म्हणजे जुनी रचना बदलण्यात आली असून ज्या ठिकाणी जुन्या वास्तू आहेत, तिथे नवीन बांधकामाचे पुरावे सापडले आहेत. मंदिराचे दरवाजे, खिडक्या आणि सजवलेल्या भिंती यासारख्या रचनांना प्लास्टर आणि रंगरंगोटी करण्यात आली. मशिदीच्या आत असलेल्या मोठ्या घुमटावर तारेला बांधलेल्या साखळीने झुंबर लटकवलेले आहे. अशा साखळ्या मंदिरांमध्ये घंटा टांगण्यासाठी वापरल्या जातात, असा दावा न्यायालयात करण्यात आला.

२४ नोव्हेंबर रोजी सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार, ४ जणांचा मृत्यू

हिंदू पक्षकारांनी उच्च न्यायालायत केली की, जामा मशीद पूर्वी हरिहर मंदिर होती जी बाबरने १५२९ मध्ये पाडून मशिदीत रूपांतरित केली. याबाबत १९ नोव्हेंबर २०२४ रोजी संभल न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. त्याच दिवशी म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग आदित्य सिंह यांनी मशिदीच्या आत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर न्यायालयाने रमेश सिंह राघव यांची वकील आयुक्त म्हणून नियुक्ती केली. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता पथक सर्वेक्षणासाठी मशिदीत पोहोचले. २ तास सर्वेक्षण केल्याने त्या दिवशी सर्वेक्षण पूर्ण झाले नाही. त्यानंतर, सर्वेक्षण पथक २४ नोव्हेंबर रोजी जामा मशिदीत पोहोचत मशिदीच्या आत सर्वेक्षण(Jama Masjid ASI Survey) सुरू केले यावेळी यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या मुस्लिम जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली. हिंसाचारात गोळी लागल्याने ४ जणांचा मृत्यू झाला होता.(Jama Masjid ASI Survey)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.