• होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Search
Hindhusthanpost.com
हिंदी
30 C
Mumbai
Hindhusthanpost.com
Tuesday, May 20, 2025
Facebook
Instagram
Twitter
Youtube
हिंदी
  • होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Home क्राईम पोस्ट पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या Jyoti Malhotra चे इंस्टाग्राम अकाउंट बंद!
  • क्राईम पोस्ट

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या Jyoti Malhotra चे इंस्टाग्राम अकाउंट बंद!

May 19, 2025
106
Facebook
Twitter
WhatsApp
Email
    Jyoti Malhotra : युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे. त्यानंतर केंद्रीय गुप्तचर तपास यंत्रणेने सगळीकडे झाडाझडती करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये हेरगिरी संदर्भात ज्योतीच्या संपर्कात असलेल्या आणखी व्यक्तीची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे. (Jyoti Malhotra)

    (हेही वाचा – अमित ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लिहीलेल्या पत्रावर Ashish Shelar म्हणाले …)

    हरियणामधील हिस्सार पोलिसांनी १८ मे ला रात्री ज्योतीच्या घरी जाऊन चौकशी केली होती. तिथून काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) देखील ज्योतीच्या दहशतवादी संबंधांबद्दल चौकशी करण्यासाठी हिस्सारला पोहोचले आहे. तसेच ज्योती प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर, बरेच लोक तिचे यूट्यूब अकाउंट ब्राउझ करत आहेत. त्यामुळे तीचे  सबस्क्रायबर्सच्या संख्येत वाढ झाली आहे.

    ज्योती मल्होत्राचे इंस्टाग्राम अकाउंट बंद
    ज्योती मल्होत्राचा इंन्स्टाग्राम आयडी travelwithjo1 या नावाने आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तीचे इंस्टाग्रामवर १.३३ लाख फॉलोअर्स होते. अनेक माध्यम वाहिन्यांनी त्यांच्या अहवालांमध्ये ज्योतीच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा उल्लेख केला आहे. रविवारपर्यंत हे खाते सक्रिय होते असे सांगण्यात येते. मात्र सोमवारी ज्योतीचे इन्स्टाग्राम खाते चालू नसल्याचे दिसून येते. हे खाते कोणी बंद केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

    (हेही वाचा – Fire : विधानभवनाच्या दारात अचानक आग; स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्ट सर्किट, विधिमंडळात खळबळ)

    इंस्टाग्राम आयडी न दिसण्याची कारणे कोणती?
    • वापरकर्त्याचे इंस्टाग्राम दिसत नाही याची अनेक कारणे आहेत.
    • जर एखाद्या वापरकर्त्याने त्याचे खाते कायमचे किंवा तात्पुरते हटवले तर ते उपलब्ध होत नाही.
    • अनेक वेळा वापरकर्ता नाव बदलल्यामुळे जुने खाते दिसत नाही.
    • जर एखाद्या वापरकर्त्याने अटी आणि शर्तींचे उल्लंघन केले तर त्याचे/तिचे खाते तात्पुरते किंवा कायमचे बंद केले जाऊ शकते. 
    • कधीकधी तांत्रिक कारणांमुळे इंस्टाग्राम अकाउंट दिसत नाही.

      (हेही वाचा – 11th Admission 2025: अकरावीसाठी प्रवेशाची लगबग; सोमवारपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू)

    यूट्यूब कारवाईच्या प्रतीक्षेत ? 
    ज्योती मल्होत्राच्या यूट्यूब सबस्क्राइबर्सची संख्या ३ लाख ७७ हजार होती, जी सोमवारी वाढून ३ लाख ८५ हजार झाली. ज्योतीचे ‘ट्रॅव्हल विथ जो’ (Travel with Jo) हे यूट्यूब चॅनल मोठ्या संख्येने लोक पाहतात. आतापर्यंत फक्त त्याचे इस्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आले आहे. यूट्यूब आणि फेसबुक अकाउंट चालू आहेत. त्यामुळे ज्योतीने तिच्या यूट्यूब चॅनेलवर ४८७ व्हिडिओ अपलोड केले आहेत. ज्योतीने शेवटचा व्हिडिओ ७ दिवसांपूर्वी अपलोड केला होता जो इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून दिल्लीला परततानाचा आहे. 

    हेही पहा –

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

    Check your inbox or spam folder to confirm your subscription.

    • TAGS
    • Jyoti Malhotra
    • Jyoti Malhotra's Instagram account banned
    • NIA
    • spy Jyoti Malhotra
    • Travel with Jo
    Facebook
    Twitter
    WhatsApp
    Email
      Previous articleHealth Services मध्ये मोठे बदल होणार; महाराष्ट्रासाठी नवे आरोग्य धोरण, मंत्र्यांचे क्रांतिकारी आदेश
      Next articleसरन्यायाधीशांचा अवमान? प्रोटोकॉल भंगामुळे CJI B. R. Gavai यांचा रोष; राज्य प्रशासनाची का झाली चूक?
      Dhanraj Salvi

      Latest News

      • ISI एजंटने भारतातील हेरांना कोणतं काम दिले होतं?, दोघांतील संभाषण तपास यंत्रणांच्या हाती, वाचा संपूर्ण बातमी May 19, 2025
      • Pakistan’s helpers : ज्योती मल्होत्रापासून हरकिरत सिंगपर्यंत १० हेर अटकेत; कुणावर काय-काय आरोप, जाणून घ्या May 19, 2025
      • IPL 2025, Play-off Race : बाद फेरीचे ३ संघ ठरले; एका जागेसाठी लखनौ, मुंबई, दिल्लीत टक्कर May 19, 2025
      • Operation Sindoor : ​​राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष पाकिस्तानची भाषा बोलत आहेत का? भाजपाचा हल्लाबोल May 19, 2025
      • ‘गौरवशाली महाराष्ट्र दर्शन’चे मंत्रालयात भव्य उद्घाटन; एकाच छत्राखाली Maharashtra राज्याच्या ६५ वर्षांच्या इतिहासाचा प्रवास! May 19, 2025
      Join Our WhatsApp Community

      Popular

      • ISI एजंटने भारतातील हेरांना कोणतं काम दिले होतं?, दोघांतील संभाषण तपास यंत्रणांच्या हाती, वाचा संपूर्ण बातमी May 19, 2025
      • Pakistan’s helpers : ज्योती मल्होत्रापासून हरकिरत सिंगपर्यंत १० हेर अटकेत; कुणावर काय-काय आरोप, जाणून घ्या May 19, 2025
      • IPL 2025, Play-off Race : बाद फेरीचे ३ संघ ठरले; एका जागेसाठी लखनौ, मुंबई, दिल्लीत टक्कर May 19, 2025
      • Operation Sindoor : ​​राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष पाकिस्तानची भाषा बोलत आहेत का? भाजपाचा हल्लाबोल May 19, 2025
      • ‘गौरवशाली महाराष्ट्र दर्शन’चे मंत्रालयात भव्य उद्घाटन; एकाच छत्राखाली Maharashtra राज्याच्या ६५ वर्षांच्या इतिहासाचा प्रवास! May 19, 2025
      Tweets by HindusthanPostM

      © Hindusthan Post All Rights Reserved

      • About Us
      • Contact Us
      • Disclaimer
      • Terms Of Service
      • Privacy Policy
      This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
      Accept
      Decline