-
प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवणारा टप्पा सुरू होणार आहे, अशी स्पष्ट दिशा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी दिली. आरोग्य धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करा, असे आदेश त्यांनी मुंबईतील आरोग्य भवन येथे घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत दिले. यावेळी राज्याच्या आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी आणि पारदर्शकतेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. (Health Services)
कोण होते बैठकीला उपस्थित?
बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर होते. आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव वीरेंद्र सिंह, आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, विजय कंदेवाड, डॉ. स्वप्नील लाळे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Health Services)
(हेही वाचा – 11th Admission 2025: अकरावीसाठी प्रवेशाची लगबग; सोमवारपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू )
निर्णयांची झपाटलेली मालिका :
कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत संधी
- राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश
- मातृवंदना योजनेतील कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र पाठपुरावा करण्याचे निर्देश
बदल्या आता पारदर्शक!
- 8 वर्षांपेक्षा जास्त कालावधी सेवा केलेल्यांची बदली समुपदेशनातून
- S-23 वेतनश्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या कामगिरी अहवालावर
- समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्या 31 मेपूर्वी
भरती प्रक्रियेला गती
- वर्ग-1 डॉक्टर भरतीसाठी MPSC कडे तातडीने पाठपुरावा
- नर्सिंग कायद्यात सुधारणा; विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडणार
प्रोत्साहन भत्ते व नवीन केंद्रे
- वैद्यकीय सहाय्यता कक्ष कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्त्यांचा प्रस्ताव
- आशा वर्कर्ससाठी मोबदला ₹5 वरून ₹20 करण्याचा प्रस्ताव
- कोल्हापूर, मुंबई, संभाजीनगरमध्ये नवीन सहाय्यता कक्ष स्थापन
150 दिवसांचा कृती आराखडा
- 20 मेपूर्वी सादर करायचा आदेश
- 17 कॅन्सर डे-केअर सेंटर्स, टीबी मुक्त पंचायत, तंबाखू मुक्त शाळा अभियानाची घोषणा (Health Services)
(हेही वाचा – अमित ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लिहीलेल्या पत्रावर Ashish Shelar म्हणाले …)
दुर्गम भागासाठी विशेष सवलती
- आदिवासी भागातील डॉक्टरांसाठी विशेष योजना
- NIV धर्तीवर प्रयोगशाळा स्थापनेसाठी ₹44 कोटींची मागणी
- पीएम मेडिसिटीसाठी पुणे-कोल्हापूरमध्ये जागेचा शोध
बजेट प्रस्तावांची अंतिम मुदत 31 मे
- अर्थसंकल्पीय तरतुदी आणि पूरक मागण्यांसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
आरोग्यमंत्र्यांचा दृष्टिकोन
“पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा हा आमचा मंत्र आहे. आरोग्य क्षेत्रात मोठे बदल होणार असून प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे,” असे प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले.
31 मे 2025 ही सगळी धोरणं आणि निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी अंतिम मुदत असून, या कालावधीत आरोग्य विभागात संपूर्ण व्यवस्थेची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे. नागरिकांना लवकरच अधिक सक्षम आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. (Health Services)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community