भारत सरकारने ‘Operation Sindoor’ अंतर्गत दहशतवादाविरोधातील कारवाईची माहिती जगभरात पोहोचविण्यात येणार आहे. भारत सरकारने नियुक्त केलेल्या सात खासदारांच्या शिष्टमंडळामार्फत विविध देशांतील राष्ट्रप्रमुखांना ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)संदर्भात माहिती देण्यात येणार आहे. विशेषतः सर्वपक्षीय शिष्टमंडळापासून तृणमूल काँग्रेसने स्वतःला दूरच ठेवले आहे. तृणमूलने आपल्या खासदारांना परदेशात पाठविण्यास नकार दिला असून केंद्र सरकारच्या ‘एक अभियान, एक संदेश, एक भारत : ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी होणे नाकारले आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षाने खासदार निवडण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाशी असहमती दर्शविली. त्यातच आता पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद हिंसाचाराच्या वेळी चहा पिणारे तृणमूल खासदार युसूफ पठाण यांनी ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)बाबत स्थापन केलेल्या शिष्टमंडळात सहभागी होण्यास नकार दिला. दहशतवादाविरोधातील मिशन भारताने जागतिक व्यासपीठावर पोहोचविण्याकरिता शिष्टमंडळ स्थापन केले आहे.
तृणमूलचे खासदार युसुफ पठाण यांचा जेडीयू नेते व खासदार संजय कुमार झा यांच्या शिष्टमंडळात समावेश करण्यात आला होता. परंतु, खासदार युसूफ पठाण त्या शिष्टमंडळाचा भाग असणार नाहीत. त्याच वेळी, दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनीदेखील स्पष्ट केले आहे की युसूफ पठाण किंवा त्यांच्या पक्षाचा कोणताही नेता या शिष्टमंडळाचा भाग असणार नाही. यासंदर्भात पक्षाचे सरचिटणीस व खासदार अभिषेक बॅनर्जी यांनीदेखील कोलकाता येथे निवेदन जारी केले आहे.
ते म्हणाले, “केंद्र सरकार तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधीचा निर्णय कसा घेऊ शकते? त्यांनी विरोधी पक्षांशी चर्चा करून कोणता पक्ष कोणता प्रतिनिधी पाठवेल हे ठरवायला हवे होते. तृणमूल काँग्रेसचा कोणता प्रतिनिधी पाठवेल हे भाजप कसे ठरवू शकते?, असा सवाल अभिषेक बॅनर्जी यांनी उपस्थित केला. तृणमूल काँग्रेस शिष्टमंडळावर बहिष्कार टाकत नसून राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचे राजकारण न करणारा हा एकमेव पक्ष आहे, अशी सारवासारव तृणमूलकडून करण्यात येत आहे.
तृणमूल खासदार युसूफ पठाण कुठल्या शिष्टमंडळात होते?
केंद्र सरकारच्या ‘एक अभियान, एक संदेश, एक भारत : ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)ला जागतिक स्तरावर आणणाऱ्या शिष्टमंडळात माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसूफ पठाण यांचे नाव होते. पण, तृणमूल काँग्रेसने त्यांना शिष्टमंडळाच्या परदेश दौऱ्यात जाण्याची परवानगी नाकारली आहे. जद(यू) खासदार संजय झा यांनी युसूफ पठाण यांना शिष्टमंडळात सामील होण्यास सांगितले होते. झा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया, जपान, सिंगापूर या देशांतील प्रमुखांना माहिती देणार आहे.(Operation Sindoor)
Join Our WhatsApp Community