Hyderabad मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट पोलिसांनी उधळला; ISIS सोबत संपर्कात असलेल्या दोघांना ठोकल्या बेड्या  

106
हैदराबादमध्ये एका दहशतवादी कटाचा पर्दाफाश झाला आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी बॉम्ब बनवण्याचा कट रचत होते. या टोळीत आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याचा आयसिस मॉड्यूलशी संबंध असल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच यापैकी एकाचे नाव सिराज असून तो विजयनगरम येथील आहे, तर दुसरा समीर हा हैदराबादचा आहे. (Hyderabad)

(हेही वाचा – “ईडी-एनआयएने सर्व युट्यूबर्स, मीडिया इन्फ्लुएंसर आणि फेसबुक पत्रकारांची चौकशी करावी” ; Jyoti Malhotra प्रकरणावर निशिकांत दुबे यांची मोठी मागणी !)

हैदराबाद राज्यातील विजयनगरम जिल्ह्यात संसंबंधित प्रकरण आहे. हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या कट रचल्याबद्दल गुप्तचर माहितीच्या आधारे, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या काउंटर-इंटेलिजन्स अधिकाऱ्यांना माहिती मिळाली. त्यानंतर विजयनगरम पोलिसांसह संयुक्त कारवाई सुरू केली आणि विजयनगरम शहरातील रहिवासी सिराज-उर-रहमान नावाच्या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून अमोनियम, सल्फर आणि अॅल्युमिनियमसारखे स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले, जे सामान्यतः बॉम्ब बनवण्यासाठी वापरले जातात.

सोशल मीडियावरून बॉम्ब बनवण्याच्या तंत्रे शिकले
गेल्या सहा महिन्यांपासून गुप्तचर विभाग रहमानवर बारकाईने लक्ष ठेवून होते. विजयनगरम पोलिसांसोबत त्यांनी त्याच्या घरावर अचानक छापा टाकला. रहमानने दिलेल्या माहितीच्या आधारे, सय्यद समीर नावाच्या आणखी एका तरुणाला हैदराबाद येथून अटक करून विजयनगरमला आणण्यात आले. विजयनगरम पोलिसांना असे आढळून आले की, आरोपीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे बॉम्ब बनवण्याचे तंत्र शिकले होते आणि त्यांनी अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केले.
निर्जनस्थळी स्फोटांची केली चाचणी
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही आरोपींनी ऑनलाइन स्फोटके खरेदी केली आणि विजयनगरममध्ये निर्जनस्थळी स्फोटांचा चाचणी केली. त्यानंतर  स्फोटांच्या चाचणीनंतर, दोघांनाही स्फोट घडवून आणायचे होते. सिराज आणि समीर दोघेही सोशल मीडियाद्वारे संपर्कात आले आणि त्यांनी आयसिसच्या कारवायांवर चर्चा करण्यास सुरुवात केली अशी माहीती मिळाली. परस्पर विश्वास निर्माण झाल्यानंतर दोघांनीही दहशतवादी कारवाया करण्याचा निर्णय घेतला.

(हेही पहा – “ईडी-एनआयएने सर्व युट्यूबर्स, मीडिया इन्फ्लुएंसर आणि फेसबुक पत्रकारांची चौकशी करावी” ; Jyoti Malhotra प्रकरणावर निशिकांत दुबे यांची मोठी मागणी !)

पोलीस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीर यांच्यासह देशातील इतर अनेक राज्यांमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहिम सुरू केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी पंजाबमधील १५ ठिकाणी छापेमारी केली. पाकिस्तानातील खलीस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ रिंडा याच्याशी संबंधीत गँगस्टर हॅप्पी पास्सीयन याच्या ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गुरदासपूर येते पोलीस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला झाला होता, त्याच्याशी संबंधीत प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.