हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना पकडल्यानंतर, आणखी एक युट्यूबर चर्चेत आहे. या युट्यूबरचे नाव नवांकुर चौधरी आहे आणि तो ‘डॉक्टर यात्री’ नावाने एक युट्यूब चॅनल चालवतो. गेल्या वर्षी मार्चमध्ये ‘डॉक्टर यात्री’ने पाकिस्तान दूतावासाच्या राष्ट्रीय दिनाच्या पार्टीलाही हजेरी लावली होती, जिथे ज्योती पाक दूतावासातील अधिकारी दानिशशी भेटताना दिसली. (Jyoti Malhotra)
ज्योतीचा नवांकुर धनखरसोबतचा सेल्फी
ज्योतीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर डॉक्टर यात्री यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या नवांकुर चौधरी सोबतचा सेल्फी पोस्ट केला. ज्योतीप्रमाणेच तो पाकिस्तानलाही गेला आहे. त्याने त्याचे फोटोही त्याच्या अकाउंटवर शेअर केले. त्यानंतर, सोशल मीडियावर नवांकुरवरही हेर असल्याचा आरोप होऊ लागला आहे. (Jyoti Malhotra)
माझ्याविरुद्ध एकही पुरावा सापडला तर …
नवांकूरने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ जारी करून स्पष्ट केले की, “मी सध्या आयर्लंडमध्ये आहे. सकाळी उठल्यावर सोशल मीडिया पाहून मला ज्योतीच्या अटकेची माहिती मिळाली. लोक म्हणत आहेत की मी देखील पाकिस्तानला गेलो होतो. मी भारतात येताच आणि माझा पासपोर्ट स्कॅन करताच पोलिसांना कळेल. जर मी पाकिस्तानसोबत भारताच्या कोणत्याही सुरक्षेचे उल्लंघन केले असेल किंवा माझ्याविरुद्ध एकही पुरावा सापडला असेल तर मला विमानतळावरून उचलून तुरुंगात टाका, मला काहीही हरकत नाही. मी यापेक्षा जास्त काहीही बोलू शकत नाही.” असे तो म्हणाला आहे. (Jyoti Malhotra)
View this post on Instagram
95 हून अधिक देश फिरला
नवनांकुर यांनी सोशल मीडियावर सांगितले की, त्यांचे स्वप्न जगातील प्रत्येक देशात प्रवास करण्याचे आहे. आतापर्यंत 95 हून अधिक देशांना प्रवास केला आहे. यामध्ये पाकिस्तान, दुबई, नेपाळ, मलेशिया, सिंगापूर, रशिया, मालदीव, श्रीलंका आणि जपान यांचा समावेश आहे. (Jyoti Malhotra)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community