
Drug Smuggling : मुंबईसह देशभरात ड्रग्ज तस्करीचे प्रकरण मोठ्या प्रमणात वाढत आहे. अशातच एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना (Mumbai Police) यश आले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी ड्रग्जही जप्त (Drugs seized) केले असून, त्याची बाजाराभावानुसार १३ कोटी किंमत आहे. या ड्रग्ज प्रकरणात आणखी कोण-कोण सामील आहेत. तसेच हे ड्रग्ज कुठून आणले गेले. याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. (Drug Smuggling)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये मार्च महिन्यात मुंबई पोलिसांनी एका आरोपीला ड्रग्जसह पकडले आणि अटक केली. त्याच्या ४.५ लाखांचे एमडी नावाचे ड्रग्ज (MD Drugs) सापडले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, अटक केल्यानंतर आरोपीची चौकशी करण्यात आली. आरोपीने त्यांच्या सहकाऱ्यांची नावे चौकशीत उघड केली. त्याच माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून पाच आरोपींना अटक केली.
दक्षिण मुंबईत पोलिसांनी टाकली धाड
मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, झोन ६ च्या अँटी नार्कोटिक्स सेल, आरसीएफ पोलीस, दहशतवाद विरोधी पथक यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण मुंबईतील एका ठिकाणी धाड टाकण्यात आली. तिथे ६.६ किलो एमडी या ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत १३ कोटी रुपये आहे.
(हेही वाचा – ज्योती मल्होत्रानंतर ओडिसामधील महिला यूट्यूबर Priyanka Senapati चं नाव चर्चेत; केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी)
आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या रॅकेट मध्ये आणखी कोण आहेत, याचाही तपास पोलीस करत आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये नवी मुंबईमध्ये २०० कोटीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community