ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) अंतर्गत भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात झीरो टॉलोरन्स धोरण अवलंबिले आहे. या माध्यमातून भारत सरकारने आता ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)वर भारताची भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांना विदेशात पाठविणार आहे. येत्या २२ मे पासून ७ खासदारांना १० दिवसांसाठी ५ देशांच्या भेटीसाठी पाठविण्यात येणार असून केंद्र सरकारकडून यादी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, ‘एक अभियान, एक संदेश, एक भारत : ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे लवकरच प्रमुख राष्ट्रांशी संवाद साधणार आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतातील सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे लवकरच काही प्रमुख राष्ट्रांशी संवाद साधणार आहेत. केंद्र सरकारचा हा उपक्रम दहशतवादाविरोधात भारताची सामूहिक आणि ठाम भूमिका अधोरेखित करतो. या एकत्रित प्रयत्नाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांची आणि शिष्टमंडळांची यादी केंद्र सरकारकडून जारी करण्यात आली आहे.
(हेही वाचा ‘IMF’चा पाकिस्तानला दणका; कर्ज तर दिलं पण आता लादल्या ‘या’ ११ अटी, वाचा संपूर्ण बातमी )
खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अमेरिका, पनामा, गयाना, ब्राझील, कोलंबिया या देशांना भेट देत येथील नेतृत्वाला ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देणार आहे. शांभवी खासदार, लोजपा (राम विलास), डॉ. सरफराज अहमद खासदार, जेएमएम, जी.एम. हरीश बालयोगी खासदार, टीडीपी, शशांक मणी त्रिपाठी खासदार, भाजप, भुवनेश्वर काळिता खासदार, भाजप, मिलिंद मुरली देवरा खासदार, शिवसेना, राजदूत तरणजित सिंग संधू, तेजस्वी सूर्या खासदार, भाजप
खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ इजिप्त, कतार, इथिओपिया, दक्षिण आफ्रिका या देशांना भेट देणार असून ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती येथील सरकारला देण्यात येणार आहे. शिष्टमंडळात राजीव प्रताप रूडी खासदार, भाजप, विक्रमजीत सिंग सहानी खासदार, आम आदमी पक्ष, मनीष तिवारी खासदार, काँग्रेस, अनुराग सिंग ठाकुर खासदार, भाजप, लवु श्रीकृष्ण देवरायालु खासदार, टीडीपी, आनंद शर्मा, व्ही. मुरलीधरन, राजदूत सईद अकबरुद्दीन यांचा समावेश करण्यात आला आहे.
भाजपा खासदार बैजयंत पांडा यांचं शिष्टमंडळ सौदी अरेबिया, कुवेत, बहारीन, अल्जेरिया या राष्ट्रांच्या प्रमुखांशी संवाद साधत ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देणार आहे. शिष्टमंडळात भाजपा खासदार डॉ. निशिकांत दुबे, भाजपा खासदार फंगनोन कोन्याक, भाजपा खासदार रेखा शर्मा, खासदार सतनाम सिंग संधू, गुलाम नबी आझाद यांचा समावेश करण्यात आला आहे.
डीएमके खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ स्पेन, ग्रीस, स्लोवेनिया, लाट्विया, रशिया यांसारख्या राष्ट्रांच्या प्रमुखांशी संवाद साधत ऑपरेशन सिंदूरसंदर्भात माहिती देणार आहे. करुणानिधी यांच्या शिष्टमंडळात
जीव राय खासदार, समाजवादी पक्ष, मियाँ अल्ताफ अहमद खासदार, नॅशनल काँफरन्स, कॅ. बृजेश चौटा खासदार, भाजप, प्रेमचंद गुप्ता खासदार, आरजेडी, डॉ. अशोक कुमार मित्तल खासदार, आम आदमी पक्ष, राजदूत मंजीव एस. पुरी, राजदूत जवेद अशरफ
माजी केंद्रीय मंत्री व भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ युके, फ्रान्स, जर्मनी, ईयू, इटली, डेन्मार्क या देशांच्या भेटीत तेथील सत्ताधाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देणार आहे. डॉ. दग्गुबाती पुरंदेश्वरी खासदार, टीडीपी, प्रियंका चतुर्वेदी खासदार, शिवसेना (यूबीटी), गुलाम अली खताना खासदार, नामनिर्दिष्ट, डॉ. अमर सिंग खासदार, काँग्रेस, सामिक भट्टाचार्य खासदार, भाजप, एम.जे. अकबर, राजदूत पंकज सरन यांचाही शिष्टमंडळात सहभाग असणार आहे.
(हेही वाचा Donald Trump यांच्या सल्लागार मंडळात दोन जिहादी; एक लष्कर ए तोयबाचा तर दुसरा… )
जेडीयू नेते व खासदार संजय कुमार झा यांचं शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया , जपान, सिंगापूर या देशांना भेट देत ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती सरकारला देणार आहे. खासदार झा यांच्या पराजिता सारंगी खासदार, भाजप, युसुफ पठाण खासदार, तृणमूल काँग्रेस, बृज लाल खासदार, भाजप, डॉ. जॉन ब्रिट्टास खासदार, सीपीआय (एम), प्रदन बरुआ खासदार, भाजप, डॉ. हेमांग जोशी खासदार, भाजप, सलमान खुर्शीद, राजदूत मोहन कुमार यांचाही शिष्टमंडळात सहभाग असणार आहे.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं शिष्टमंडळ संयुक्त अरब अमिरात, लायबेरिया, काँगो, सिएरा लिओन या देशांतील सरकारांना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देणार आहे. श्रीकांत शिंदे यांच्या बांसुरी स्वराज खासदार, भाजप, ई.टी. मोहम्मद बशीर खासदार, आययूएमएल, अतुल गर्ग खासदार, भाजप, डॉ. सस्मित पात्र खासदार, बीजेडी, मनन कुमार मिश्रा खासदार, भाजप, एस.एस. आहलुवालिया, राजदूत सुजन चिनॉय यांचाही सहभाग असणार आहे.
Join Our WhatsApp Community